Fishermen Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : हातात मासे अन् गळ्यात खेकड्यांची माळ घालून मच्छीमारांचे आंदोलन

Fishermen Protest : जायकवाडी धरणावरील सौर ऊर्जा प्रकल्पला विरोध करत पैठणमधील मच्छीमारांनी आंदोलन केले.

Swapnil Shinde

Chhatrapati sambhajinagar News : जायकवाडी धरणावरील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोधक करत पैठणमधील हजारो मच्छिमारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात मच्छिमारांनी हातात मासे आणि गळ्यात खेकड्यांची माळ घालून हजारो मच्छिमारांनी मोर्चा काढला.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सरकारच्यावतीने तरंगते सौर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी धरणातील १५ हजार एकरावर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या शासकीय संस्थेच्या अधिपत्याखाली व जीओ सर्व्हिसेस मॅरीटाइम प्रा. लि. या एजन्सीमार्फत सर्व्हे चालू आहे. या प्रकल्पामुळे मच्छिमारी व्यवसायावर निर्बंध येणार असून अनेकांच्या रोजगारांचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सौर प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी मच्छिमारांकडून करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

पैठणमधील दिगंबरराव कावसानकर स्टेडियम पासून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक, मार्गे मोर्चा तहसिल कार्यालयात नेण्यात आला. सौरउर्जा प्रकल्प रद्द करा अशा घोषणा देत निघालेल्या या मोर्चाने लक्ष वेधून घेतले. तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार मंगेश साबळे यांना मच्छिमार व्यावसायिकांकडून मागण्याचे निवेदन दिले. प्रारंभ करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Seed : कांदा बियाण्यांसाठी पुन्हा शोधाशोध सुरू

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

Cotton Crop Damage : कापसाच्या नुकसानीकडे विमा कंपनीची डोळेझाक

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाचा ३८ हजार हेक्टरला फटका

Crop Damage : आभाळच फाटलंय, सांगा कसं जगायचं?

SCROLL FOR NEXT