Fish Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Rate : मासळीचे दर आवाक्यात

Fish Market : मिरकरवाडा बंदरावर बांगडा १०० रुपये किलो, तर सुरमई ४०० ते ६०० रुपये किलो दराने विकली जात आहे.

राजेश कळंबटे

Ratnagiri News : महिनाभरानंतर मासळीचे दर खवय्यांच्या आवाक्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणच्या मासळी मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. मिरकरवाडा बंदरावर बांगडा १०० रुपये किलो, तर सुरमई ४०० ते ६०० रुपये किलो दराने विकली जात आहे. गेल्या काही दिवसांत खोल समुद्रात मासळी समाधानकारक मिळत असल्यामुळे त्याचा फायदा ट्रॉलिंग, पर्ससीननेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांना होत आहे.

दिवाळीपूर्वी कोकण किनारपट्टीवरील वातावरण बिघडल्यामुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत होता. काहीवेळा मच्छीमारांना नौका बंदरावरच उभ्या करून ठेवाव्या लागत होत्या; परंतु मागील आठवड्यात चित्र बदलले आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारी नौकांना समाधानकारक मासळी मिळत आहे.

त्यामुळे दरही सर्वसामान्य ग्राहकाला परवडण्यासारखे आहेत. ९०० रुपये किलो दराने मिळणारी लहान आकाराची सुरमई रविवारी ४०० रुपये, तर मोठ्या आकाराची ६०० रुपये किलो दराने मिरकरवाडा जेटीवर उपलब्ध होती. महिनाभरापूर्वी बांगड्याचा किलोचा दर २०० रुपये होता तो १०० रुपयांवर आला आहे.

सर्वसाधारण १२० पर्यंत स्थिर राहील, असा अंदाज आहे. सरंगा ६०० रुपये किलो दराने मिळत होता. महिनाभरापूर्वी हाच दर अधिक होता. सौंदाळ्याचा दर मात्र महिनाभरापूर्वीप्रमाणेच ३०० रुपये किलो इतकाच आहे. कोळंबीचा दरही प्रतवारीप्रमाणे ८० ते ३०० रुपये किलो आहे.

गिलनेट नौकांना मासळीची प्रतीक्षा

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना समाधानकारक मासे मिळत असले, तरीही गिलनेटद्वारे किनाऱ्यापासून ५ ते १० वावात मासेमारी करणाऱ्यांना मासे मिळत नाहीत. १०० पैकी ५ बोटींना मासे मिळत असल्याचे मच्छीमार अभय लाकडे यांनी सांगितले. ते म्हणाले, की मासेमारीचा खर्च २५ हजार रुपयापर्यंत येतो. मागील दीड महिन्यात समाधानकारक मासळी मिळत नाही, त्याचा फटका बसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT