POCRA  Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Agriculture Scheme : राज्यात राबवण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याचे काम संपुष्टात आले आहे.

 गोपाल हागे

Akola News : राज्यात राबवण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याचे काम संपुष्टात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पातील विविध टप्प्यांवरील कामांना अंतिम केले जात असून ३० जूनला या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम समाप्त होत आहे. प्रकल्पातील कंत्राटी मनुषबळाची सेवाही संपुष्टात येणार आहे.

राज्यात विदर्भ-मराठवाड्यातील १६ जिल्ह्यात शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या अनुषंगाने आणि शेतीपूरक व्यवसाय किफायतशीर करण्याच्या उद्देशाने जागतिक बँकेच्या अर्थसहायाने नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प सुरू करण्यात आला होता.

सहा वर्षांसाठी हा प्रकल्प सुरुवातीला जाहीर झाला. आता पोकरा ०.२ ची अंमलबजावणी केली जाणार आहे. तत्पूर्वी पहिल्या टप्पा समाप्तीच्या अनुषगांने आवराआवर सुरू आहे.

प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी गेल्या आठवड्यात काढलेल्या पत्रानुसार ग्रामकृषी संजीवनी समिती, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी स्तरावर कार्यालयीन अभिलेख अद्ययावत करून हस्तांतरण करणे, जडसंग्रह नोंदवही अद्ययावत करणे व हस्तांतरण करणे,

प्रकल्पातील सर्व संगणकांवरील माहितीचा बॅकअप घेणे, प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रलंबित पत्रांवर कार्यवारी, ग्राम कृषी संजिवनी समितीचे बँक खाते बंद करणे, लेखापरीक्षण, लेखा परीक्षणात उपस्थित झालेल्या मुद्यांचे निराकरण अहवाल संबंधित लेखापरीक्षकांना सादर करणे, अशा स्वरूपाच्या सूचना केल्या आहेत.

कंत्राटी मनुष्यबळ ३० जूनपर्यंतच

या प्रकल्पात कंत्राटी स्वरूपात नेमलेले मनुष्यबळ ३० जून २०२४ पर्यंत कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर त्या सर्वांच्या सेवा समाप्त होत आहेत. याबाबत कार्यवाही करून त्याचा प्राथमिक अहवालही परिमल सिंह यांनी १५ मेपर्यंत सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Industrial Development: नवीन मोठ्या उद्योगांसह प्रकल्प येण्यासाठी पोषक वातावरण: मंत्री छगन भुजबळ

ZP Election 2025: पाच तालुक्यांतील गटांच्या संरचनेत बदल

Farmer Income: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यामध्ये कोरडवाहू फळपिकांचे मोठे योगदान

Zilla Parishad elections: अहिल्यानगर ‘झेडपी’ची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Crop Loan: किसान क्रेडिट कार्डचे एक हजार पीककर्ज प्रस्ताव मंजूर करा: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

SCROLL FOR NEXT