Maldhok  Agrowon
ॲग्रो विशेष

Great Indian Bustard : नान्नज माळढोक अभयारण्य क्षेत्रात पुन्हा आग

Maldhok Bird : नान्नज माळढोक अभयारण्य अंतर्गत अकोलेकाटी हद्दीतील गट क्रमांक ११९ या परिसरातील २० हेक्टर क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडले आहे.

Team Agrowon

Solapur News : नान्नज माळढोक अभयारण्य अंतर्गत अकोलेकाटी हद्दीतील गट क्रमांक ११९ या परिसरातील २० हेक्टर क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. या लागलेल्या आगीमुळे अभयारण्यातील गवतासह इतर झाडांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नेमकी ही आग कशामुळे लागली याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही.

दोनदिवसापूर्वी पहाटे लागलेल्या या आगीची वनाधिकारी व वन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली. रविवारी पहाटे वनपाल संतोष मुंडे व वनरक्षक ललिता बडे व इतर वन कर्मचाऱ्यांनी वनक्षेत्रातील आग विझविण्याचे प्रयत्न केल्याचे अतिरिक्त वनपरिक्षेत्र अधिकारी गुरुदत्त दाभाडे यांनी सांगितले.

अकोलेकाटी गट क्रमांक ११९ मधील क्षेत्रावरील उंच वाढलेले व झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत वनाधिकाऱ्यांना विचारले असता सुरवातीला वन अधिकाऱ्यांनी फक्त अडीच हेक्टर क्षेत्र जळाल्याचे सांगितले. पण हे क्षेत्र अधिक आहे. फक्त अडीच हेक्टर क्षेत्राची जळीत क्षेत्र (पीआरओ) नोंद करून अज्ञातावर गुन्हा दाखल केल्याचे वनाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

वारंवार घटना, तरीही दुर्लक्ष

अज्ञात कारणावरून नान्नज माळढोक अभयारण्यात लागलेल्या आगीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, तरीही, याची नोंद अभयारण्यातील अधिकारी कमी दाखवतात, ही बाब आता नित्याचीच झाली आहे.

यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे, माळढोकचे भक्ष्य असणारे कीटक या आगीत जळून खाक होत आहेत. वारंवार लागणाऱ्या आगीने वनसंपत्ती ही नष्ट होत असल्याचे पर्यावरण प्रेमातून सांगितले जाते.

अग्निशामक दलाची गाडी आवश्यक

जानेवारी ते जून या महिन्यात माळढोक घाबरण्यातील गवत हे पूर्णपणे वाळलेले असते. यामुळे सतर्कता बाळगण्यासाठी या परिसरात किमान सहा महिने तरी अग्निशामक दलाची गाडी तैनात करावी, अशी मागणी होत आहे. जेणेकरून वनसंपदा नष्ट होण्यापासून वाचवता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Pumps Power Connections: महावितरणकडून १३ हजारावर कृषीपंपांना वीजजोडण्या

Sugarcane Smut Disease: उसावरील चाबूक काणी रोगाचे नियंत्रण कसे करावे?

Kharif Crop Loan Rates: नांदेडला पिकांसाठी पीककर्ज दर निश्चित

Organic Fertilizers: सेंद्रिय खतांमुळे जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कशी वाढते?

Mohol-Tandulwadi Highway Project: मोहोळ-तांदूळवाडी महामार्गावरून सोलापुरात ‘श्रेयवाद’

SCROLL FOR NEXT