Agricultural Service Center Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Service Center : लासलगावात कृषिसेवा केंद्राला आग

Fire at the Agricultural Service Center : लासलगाव-कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी सेवा केंद्राला रविवारी (ता. १७) दुपारी भीषण आग लागली.

Team Agrowon

Nashik News : लासलगाव-कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी सेवा केंद्राला रविवारी (ता. १७) दुपारी भीषण आग लागली. आगीत मोठे नुकसान झाले. दुपारी अचानक या पत्र्याच्या दुकानातून धूर निघू लागल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले.

दुकानाच्या आतील काही रासायनिक औषधे, कीटकनाशकांच्या बाटल्या आणि ड्रम फुटून मोठा आवाज येऊ लागला. आग लागल्याचे दिसताच तरुण आणि नागरिकांनी धाव घेतली. डी. के. नाना जगताप, निरंजन ट्रान्स्पोर्ट, लासलगाव बाजार समितीसह नागरिकांनी स्वतःच्या पाण्याचे टँकर आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

सुमारे अर्धा-पाऊण तासानंतर पिंपळगाव, चांदवड, निफाड येथून अग्निशमन दलाचे बंब आले. तोपर्यंत आगीचे प्रमाण थोडेफार कमी झाले होते. मात्र, प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात दिसू लागल्याने नागरिक भयभीत झाले होते.

दुकानात कीटकनाशके व औषधांचा साठा असल्याने विषारी वायूचा दर्प हवेत पसरला होता. लासलगावकरांनी जीवावर उदार होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, तसेच किती रुपयांचे नुकसान झाले तेही समजू शकले नाही.

आगीत खते, औषधे आणि कीटकनाशके, बी-बियाणे भस्मसात झाली. सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण उदे, उपनिरीक्षक सुरवसे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी मदत कार्यात लक्ष घातले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: ‘हळदीच्या वायद्यां’साठी ‘सेबी’वर धडक

Residue Free Farming: अवशेषमुक्त शेतीपद्धतीच मानवी आरोग्याला तारणार

Aaple Sarkar: विद्यापीठाच्या ५६ अधिसूचित सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर

Kharif Crop Disease: पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भाव

Crop Cutting Experiment: पीककापणी प्रयोगात मोईश्‍चर मीटरचा वापर बंधनकारक करावा

SCROLL FOR NEXT