Abdul Sattar  Agrowon
ॲग्रो विशेष

Abdul Sattar: अखेर कृषिमंत्र्यांनी केला नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा; तातडीने पंचनाम्याचे आदेश 

शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, रब्बी ज्वारी आदि पिकांचे नुकसान झाले. सत्तारांनी नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा शनिवारी केला.

Team Agrowon

Crop Damage : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून घेतला आहे. मागच्या आठ दिवसांत वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी शनिवारी (ता.१८) जालना जिल्ह्यातील वडीगोद्री भागातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ  पंचनामे करण्याचे आदेश दिले.

राज्यातील शेतकरी वादळी पावसाच्या चक्रात फसले आहेत. रब्बी पिकांच्या काढणी दरम्यान गारपीट झाली.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, रब्बी ज्वारी आदि पिकांचे नुकसान झाले. सत्तारांनी नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा शनिवारी केला.

यावेळी गहू पिकाच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. तसेच नुकसानीची माहिती लवकरात लवकर कृषी विभागाला सादर करण्याचे आदेश दिले.

"शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा. शेतात कोणते पीक आहे, काय परिस्थिती आहे, याची  पूर्ण माहिती घ्या.

जे काही नुकसान शेतकऱ्यांचे झाले असेल त्याची तंतोतंत माहिती माझ्याकडे द्या." असे आदेश कृषिमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

राज्यात पुढील आठ दिवस ढगाळ आणि पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.

तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यात गारपीटीचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचे प्रत्येकवेळी आश्वासन देते. पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठोस अशी मदत जाहीर करत नाही, अशी तक्रार शेतकरी करत आहेत. 

राज्य सरकारने शेतकरी वाऱ्यावर सोडले आहेत का, कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांकडे आहे का, असा प्रश्न विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी शुक्रवारी उपस्थित केला होता.

त्यानंतर शनिवारी कृषिमंत्र्यांनी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतांची पाहणी दौरा केला.

तसेच स्वत:चा मोबाइल नंबर जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती देण्याचे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT