Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीक विम्याची २५ टक्के अग्रिम भरपाई अखेर मिळणार

Advance Crop Insurance : अखेरीस या पाठपुराव्याला यश येऊन विमा कंपनीने सोयाबीन, बाजरी व मका पिकासाठी आगाऊ रक्कम मंजूर केली.

Team Agrowon

Solapur News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका व बाजरी पिकांसाठी सर्व पात्र विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाई रक्कम नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप २०२३ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता लक्षात घेता. प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९२ महसूल मंडळे व आठ तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देणेबाबत पीकविमा कंपनीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सूचना केल्या, मात्र याबाबत पीकविमा कंपनीमार्फत निर्णय घेण्यात येत नव्हता.

पीकविमा कंपनीस वेळोवेळी जिल्हास्तरीय बैठकांमध्ये तसेच लेखी पत्राद्वारे वांरवार सूचना देऊन तसेच अपर मुख्य सचिव कृषी विभाग, कृषी आयुक्त यांच्याशी दूरध्वनीद्वारे तसेच कृषिमंत्री व पालकमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. त्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पाठपुरावा केला.

अखेरीस या पाठपुराव्याला यश येऊन विमा कंपनीने सोयाबीन, बाजरी व मका पिकासाठी आगाऊ रक्कम मंजूर केली. त्यानुसार शेतकऱ्यांना २५ टक्के अगाऊ रक्कम देण्यात येणार असून, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून विमाधारक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे, असे गावसाने यांनी सांगितले.

उर्वरित पिकांसाठीही पाठपुरावा

सध्या पहिल्या टप्प्यात सोयाबीन, बाजरी आणि मका या पिकांसाठी ही रक्कम मंजूर झाली आहे. अधिसूचनेमधील उर्वरित पिकांसाठीही शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी विमा कंपनीकडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पाठपुरावा करत असून, लवकरच उर्वरित पिकांसाठीही विमा कंपनी आगाऊ रक्कम मंजूर करेल, अशी माहितीही श्री. गावसाने यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT