Chemical-Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Ravindra Chavan : खते, बियाण्यांत शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

Bogus Fertilizer Selling : सेंद्रिय खतांच्या नावाने बोगस खत विक्री आणि बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

Team Agrowon

Sindhudurg News : सेंद्रिय खतांच्या नावाने बोगस खत विक्री आणि बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली.

या बैठकीला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, राजन तेली आदी उपस्थित होते.

जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी खरीप पिकांखाली ६३ हजार ४५६ हेक्टर क्षेत्र असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये भात आणि नागली ही प्रमुख पिके आहेत. ऊस पिकाखाली ३ हजार २९४ हेक्टर क्षेत्र आहे.

खरीप हंगामासाठी भात बियाण्यांची ८ हजार १०० क्विंटल मागणी असून जिल्ह्यात आजअखेर २ हजार ४१४ क्विंटल भात बियण्यांचा पुरवठा झाला आहे. रासायनिक खतांचा ११ हजार ५२० टन कोटा मंजूर असून आतापर्यंत ३ हजार २८२ टन रासायनिक खतांचा पुरवठा झाला आहे.

निविष्ठांचा दर्जा उच्चतम राहण्यासाठी तसेच गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर ९ भरारी पथके व ९ तक्रार निवारण कक्ष तयार करण्यात आल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

या वेळी पालकमंत्री चव्हाण यांनी खतांचा नियमित पुरवठा होण्यासाठी राज्यस्तरावर कोकण रेल्वे व ‘आरसीएफ’ची बैठक घेवून नियोजन करण्यात यावे, अशी सूचना केली.

सेंद्रिय खतांच्या नावाखाली माती विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणारी प्रकरणे उघडकीस आणून देणाऱ्यास सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत बक्षीस दिले जाईल. अशी फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत.

पालकमंत्री म्हणतात...

- वाढत्या तापमानवाढीमुळे विमा निकषात बदल करण्यासाठी अहवाल तयार करावा.

- कृषी विभागाने शेतकऱ्यांना सर्व माहीती मिळेल असे ॲप तयार करावे.

- तालुकानिहाय पर्जन्य आणि तापमानाबाबतची माहिती शेतकऱ्यांना द्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Santosh Kakde: चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे विभागात अव्वल 

Agriculture Scheme: जुनी विहीर दुरुस्तीसाठी १ लाखांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

Farmer loan Waiver: कर्जमाफीसाठी मुंबई एकदिवस बंद करा; बच्चू कडू यांची राज ठाकरेंकडे मागणी 

Forest Encroachment: वनजमिनीवर अतिक्रमणकर्त्यांवर फौजदारी

Ambajogai KVK: अंबाजोगाई केव्हीकेमध्ये ‘किसान गोष्टी’

SCROLL FOR NEXT