Solar Energy  Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Energy Project : कोल्हापूर जिल्ह्यातील पाचवा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

Chief Minister Solar Agricultural Channel Scheme : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही शेतकऱ्यांच्या हिताची असून यामुळे शेतीकरिता दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुखकर होणार आहे, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही शेतकऱ्यांच्या हिताची असून यामुळे शेतीकरिता दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुखकर होणार आहे, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले. हरळी बुद्रूक (ता.गडहिंग्लज) येथील ३ मेगावॉट सौर प्रकल्प कार्यान्वय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पातून ११०१ शेतकऱ्यांना शेतीकरिता दिवसा वीज पुरवठा होणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी उपस्थित शेतकरी यांच्यासोबत संवाद साधला व उपस्थित अधिकाऱ्यांना उर्वरित सर्व प्रकल्प गुणवत्तापूर्ण व जलद गतीने पूर्ण करावेत असे निर्देश दिले. याप्रसंगी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय आडके, उपकार्यकारी अभियंता नागेश बसरीकट्टी, सहायक अभियंता संदीप पाटील, तहसीलदार ऋषिकेत शेळके, तहसीलदार राजेश चव्हाण, मंडल अधिकारी राजेंद्र तोळे, सरपंच निलम कांबळे, उपसरपंच बाजीराव गोरुले, जनमित्र व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हरळी बुद्रूक (ता.गडहिंग्लज) हा प्रकल्प ३३/११ केव्ही महागाव उपकेंद्रास जोडण्यात आला आहे. या उपकेंद्रातून निघणाऱ्या महागाव कृषी वाहिनीवरून ६०२, नदीघाट कृषी वाहिनीवरून ८५ व हरळी कृषी वाहिनीवरून ४१४ अशा एकूण ११०१ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पामुळे तीन कृषी वाहिनी वरील महागाव, हरळी बुद्रूक, हरळी खुर्द, हुनगिनहाळ, वैरागवाडी, हसुरवाडी, हसूरसासागिरी, या गावातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.

जिल्ह्यात एकूण पाच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, ६३५० शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.हरळी बुद्रुक या प्रकल्पासह कोल्हापूर जिल्ह्यात एकूण पाच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या पाच प्रकल्पातून जिल्ह्यातील ६३५० शेतकऱ्यांना शेतीकरिता दिवसा वीज उपलब्ध होत आहे.

यामध्ये हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) प्रकल्पातून ११०१, आळते (ता. हातकणंगले) प्रकल्पातून १९१९, सातवे (ता. पन्हाळा) प्रकल्पातून १३२४, किणी (ता. हातकणंगले) प्रकल्पातून १२१६ व हरोली (ता. शिरोळ) प्रकल्पातून ७९० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

SCROLL FOR NEXT