Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Shortage : सिंधुदुर्गातील खत तुटवड्याने शेतकरी हैराण

Kharif Fertilizer Demand : कृषी विभागाच्या नियोजनशून्य आणि बेफिकीर कारभारामुळे जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : कृषी विभागाच्या नियोजनशून्य आणि बेफिकीर कारभारामुळे जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. प्रत्यक्षात मागणीच्या ३०.५७ टक्के, तर जून अखेर मंजूर आवंटनाच्या ४८.६२ टक्के खताचा पुरवठा झाला आहे. एकीकडे खताचा तुटवडा तर दुसरीकडे पॉस मशिनमुळे खत तुटवड्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

जिल्हा कृषी विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता १९ हजार ५५७ टन खतांची मागणी केली होती. जूनअखेर १२ हजार ५५७ टन आवंटन मंजूर होते. परंतु प्रत्यक्षात जूनअखेर ५ हजार ९६० टन खत उपलब्ध झाले.

यामध्ये युरिया केवळ मंजूर आवंटनाच्या ४३.६२ टक्के तर डीएपी मंजूर आवतनाच्या ४७.९० टक्के प्राप्त झाले. यापेक्षा वाईट स्थिती अन्य खतांची आहे. सध्या भातरोप पुनर्लागवडीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे युरिया आणि मिश्र खतांची मागणी वाढली आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खत मिळणे दुरापस्त झाले आहे.

पॉस मशिनने गुंता वाढविला

पॉस मशिनचा वापर खत विक्री करणाऱ्या केंद्रांनी न केल्यामुळे पोर्टलवर खताचा साठा दिसून येत आहे. त्यामुळे नवीन खताचा पुरवठा होत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. खत तुटवड्याला पॉस मशिन न केलेला वापर काही अंशी कारणीभूत ठरला आहे.

तालुकानिहाय खत पुरवठा करण्यात आला होता.काही ठिकाणचा साठा संपला आहे तर काही ठिकाणी उपलब्ध आहे.काही खत कंपन्यांशी संवाद झाला असून या आठवड्यात खताचा अपेक्षित पुरवठा होणार आहे. खत प्राप्त होताच ते तातडीने वितरित करण्यात येणार आहे.
- ज्ञानेश्वर बडे, कृषी उपसंचालक, सिंधुदुर्ग
कृषिमंत्री आणि सरकार हे शेतकऱ्याविषयी गंभीर नाहीत हेच यातून दिसून येत आहेत. सरकारला शक्तिपीठ मार्ग हवाय आणि शेतकऱ्यांना खत मिळाले नाही मिळाले तरी त्यांना काहीही फरक पडत नाही. शेतकरी देखील अन्याय होऊन देखील स्वस्थ आहे. मात्र येत्या एक दोन दिवसांत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन चर्चा करणार आहोत.
- सतीश सावंत, कणकवली विधानसभा प्रमुख, ठाकरे शिवसेना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Welfare Schemes: पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना

Agricultural Pump Cable Theft: केबल जाळून त्यातील कॉपर वायर लंपास

Urea Shortage: युरिया टंचाईचा प्रश्न मिटणार? सरकारचा दावा

Storm Damage: वादळाचा पॉलिहाउस, सौरकृषी पंप पॅनेलला तडाखा

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेत २९ हजार शेतकऱ्यांवर अपात्रतेची भीती

SCROLL FOR NEXT