Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Shortage : ‘खते उपलब्ध करून द्या, अन्यथा गोडाऊन ताब्यात घेऊ’

Fertilizer Demand : शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली आहे. मात्र, पेरणीत अत्यावश्यक असलेली रासायनिक खते बाजारात उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

Team Agrowon

Ahilyanagar News : शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली आहे. मात्र, पेरणीत अत्यावश्यक असलेली रासायनिक खते बाजारात उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने बफर स्टॉक म्हणून खते गोदामांमध्ये साठवून ठेवल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

ही खते ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत अन्यथा कार्यकर्ते गोडाऊन ताब्यात घेतील, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना हे निवेदन प्रांताधिकारी किरण सावंत यांच्यामार्फत देण्यात आले. खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू असून, या काळात शेतकऱ्यांना युरिया व अन्य खते मिळणे गरजेचे आहे.

प्रशासनाने खताचा बफर स्टॉक करून ठेवला आहे. गोदामात खते ठेवून त्याचा उपयोग काय, बाजारात खत मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत, असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत खते उपलब्ध करून देण्यात यावीत.

खते न मिळाल्यास स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना आणि महिला आघाडीच्या वतीने गोडाऊन ताब्यात घेऊन शेतकऱ्यांमध्ये खतांचे वाटप करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनीता वानखेडे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, नेवासे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले, संगमनेर तालुकाध्यक्ष रमेश शिंगोटे, कर्जत-जामखेड तालुकाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक, शेवगाव-पाथर्डी तालुकाध्यक्ष हारून सय्यद, राहुरीचे साहेबराव जगताप, तसेच आशा महांकाळे, कोमल वानखेडे, शीतल पोकळे, मंदाताई गमे, मधू काकडे, रवी वानखेडे, श्रीराम त्रिवेदी, बाळासाहेब घोगरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शेतकऱ्यांसाठी ३.१५ लाख कोटींची तरतूद

Aadhaar Authentication Farmers : आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची धावपळ

Soybean Bogus Seeds : गतवर्षी तक्रारी, यंदाही त्याच कंपन्यांचे बियाणे

Nachni Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाचणी लागवडीला प्रारंभ

Inter Cultivation Maharashtra : डवरणीला बैलजोडीचाच आधार

SCROLL FOR NEXT