Urea Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Urea Shortage : युरियाची खानदेशात टंचाई

Fertilizer Market : जळगाव तालुक्यात एक कारवाई यासंबंधी करण्यात आली आहे. युरियाची समस्या वाढत असतानाच डीएपीदेखील मिळत नाही.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : ः खानदेशात एकीकडे पावसाची तूट आहे. दुसरीकडे खतांची समस्या वाढत आहे. युरियासह डीएपी खतांची टंचाई असून, कृषी विभागाने कारवाईसत्र राबविले आहे. कारवाई व तपासणी केली जात असून, शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर भरारी पथक कारवाई करीत आहे. जळगाव तालुक्यात एक कारवाई यासंबंधी करण्यात आली आहे.

युरियाची समस्या वाढत असतानाच डीएपीदेखील मिळत नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी जेथे आहेत, तेथे कृषी विभाग कारवाईत्र राबवीत आहे. अमळनेरात मध्यंतरी दुकानांची तपासणी झाली. नोटिसा व सुनावणी ही कार्यवाहीदेखील सुरू आहे. सुनावणीसंबंधी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्याकडे संबंधित नोटीस दिलेल्या कृषी केंद्रचालकांना बोलावले जात आहे.

सोसायट्यांत शिस्तीने वितरण

काही कृषी केंद्रचालक युरियासंबंधी चुकीची माहिती देऊन, दिशाभूल करून शेतकऱ्यांना युरिया देत नाहीत. परंतु जिल्ह्यातील अनेक सहकारी सोसायट्या आपल्याकडील युरियाचे शिस्तीने वितरण करीत आहेत. पातोंडा (ता. चाळीसगाव) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने आपल्याकडील युरियाचे शेतकऱ्यांना समान वितरण केले.

कुणाचीही तक्रार येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. महिला शेतकऱ्यांना प्रथम सहकार्य करण्याची भूमिका घेतली. हीच शिस्त कृषी केंद्रांतही असावी. कृषी केंद्रांनी आपल्याकडील युरियाचे शक्य तेवढ्या शेतकऱ्यांना मागणीनुसार व उपलब्धतेनुसार वितरण करणे आवश्यक आहे, असा मुद्दाही यानिमित्त उपस्थित केला जात आहे.

युरिया पुरेसा

जिल्ह्यात युरिया पुरेसा आहे. जेथे युरिया उपलब्ध आहे, त्या दुकानांची माहिती, त्यांच्याकडे किती युरिया आहे याची नोंदही मोबाइलवर मिळत आहे. त्यासाठी लिक, ब्लॉग कृषी विभागाने मध्यंतरी सुरू केला असून, त्याचा उपयोग करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात शासनाने युरियाचा संरक्षित साठा केला आहे. पुरेसा युरिया असल्याची माहिती मिळाली.

नॅनो युरिया,नॅनो डीएपीचा पर्याय

फवारणीतून पिकांसाठी नॅनो युरिया व नॅनो डीएपी उपलब्ध आहे. कमी किमतीत किंवा रास्त दरात हे द्रवरूप खत असून, पिकांवर फवारणी करून युरिया व डीएपीची कमतरता पूर्ण करता येते. मोठ्या उंचीच्या पिकांवर ड्रोनद्वारे नॅनो डीएपी व नॅनो युरियाची फवारणी करता येते. अनेक शेतकरी त्याचा उपयोग करीत आहेत. कापूस, सोयाबीन, मका, केळी आदी पिकांत या खतांचा वापर अनेकांनी केल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT