Fertilizer
Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer sales center : भंडाऱ्यातील १२ कृषी केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित

Team Agrowon

Bhandara News : केंद्र शासनाने रासायनिक खतांची विक्री पॉस मशिनद्वारे करणे कृषी केंद्रचालकांना बंधनकारक केले आहे.

पण यानंतरही जिल्ह्यातील काही कृषी केंद्रचालकांनी ऑफलाईन पद्धतीने अनुदानित खताची विक्री करून कायद्याचे उल्लंघन केले आहे, अशा कृषी केंद्रचालकांची सुनावणी घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी १२ कृषी केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित केले.

कृषी केंद्रचालक नियमांचे कटाक्षाने पालन करीत आहेत किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी धडक मोहीम जिल्हा व तालुका भरारी पथकाद्वारे राबविण्यात आली होती.

या तपासणी मोहिमेत परवाना दर्शनी भागात न लावणे साठा व दर फलक ग्राहकास सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे, पॉस मशिनप्रमाणे प्रत्यक्ष साठा जुळत नसणे, साठा पुस्तक अद्ययावत नसणे, शेतकऱ्यांना एम फॉर्मची व पॉस मशिनची पावती न देणे, खत कंपन्यांचा परवान्यात समावेश असणे, खरेदी केलेल्या खताची साठा पुस्तकात नोंद नसणे शेतकऱ्यांची सही नसणे, पॉस मशिन बंद असणे, अनुदानित खताची ऑफलाईन पद्धतीने विक्री करणे या बाबी आढळून आल्याने जिल्ह्यातील १२ कृषी केंद्रचालकांचे खत विक्री परवाने निलंबित केले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा डॉ. अर्चना कडू यांनी कळविले आहे.

या केंद्रांचे परवाने निलंबित

परमात्मा कृषी केंद्र, मोहदुरा ता. भंडारा, चेतन कृषी केंद्र, हत्तीडोई ता. भंडारा, परमपूज्य श्री. माताजी निर्मलादेवी कृषी केंद्र, साखळी ता. तुमसर, हरीओम कृषी केंद्र, पवनारा ता. तुमसर, प्रियांका कृषी केंद्र, येरली, ता. तुमसर या पाच केंद्रांचे परवाने ४५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले.

तर गीता अॅग्रो एजन्सी, ठाणा, ता. भंडारा, अमन कृषी केंद्र, चिखली, ता. भंडारा, राधे कृषी केंद्र, डोंगरी बुद्रुक, ता. तुमसर, साहिल कृषी केंद्र, गोबरवाही, ता. तुमसर, रेणुका कृषी केंद्र, माडगी, ता. तुमसर, श्रीधर कृषी केंद्र, चिचोली, ता. तुमसर, आकांशा कृषी केंद्र, पवनारा, ता. तुमसर या केंद्रांचे परवाने ३० दिवसांसाठी निलंबित केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT