Krishi Seva Kendra  Agrowon
ॲग्रो विशेष

Krishi Seva Kendra Bbhandara : भंडारा जिल्ह्यातील ४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Fertilizer License Suspend : कृषी केंद्रांतील प्रत्यक्ष युरिया साठा आणि मशीनवरील नोंदी यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Team Agrowon

Bhandara News : जिल्हा भरारी पथकाच्या अचानक तपासणीदरम्यान साठ्याचा ताळमेळ न बसल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील ४ कृषी सेवा केंद्रांचे खत परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

कृषी केंद्रांतील प्रत्यक्ष युरिया साठा आणि मशीनवरील नोंदी यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या गुणवत्ता निरीक्षकांनी व्यापक तपासणी केली असून, त्यांनी १३७ किरकोळ विक्रेते व १३ घाऊक विक्रेत्यांची तपासणी पूर्ण केली.

तालुका पातळीवरही गुणवत्ता निरीक्षकांकडून ३१ कृषी केंद्रांना नोटीस बजावण्यात आली असून खुलाशानंतर त्यांच्यावरही पुढील कारवाई अपेक्षित आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, योग्य शासकीय निकष पाळणे ही विक्रेत्यांची जबाबदारी असून, साठा अनियमितता अथवा गैरव्यवहार आढळल्यास अशा कठोर कारवाया पुढेही सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले.

कारवाई झालेली कृषी केंद्रे (परवाने निलंबित कालावधी)

जय भारत कृषी केंद्र, गणेशपूर – १५ दिवस

आर. एम. कृषी केंद्र, नवरगाव – ३० दिवस

परमात्मा एक कृषी केंद्र, मोहदुरा – १० दिवस

पवन कृषी केंद्र, खापा – १५ दिवस

खताची विक्री केल्यानंतर नियमानुसार पॉस मशीनमध्ये माहिती अपडेट करणे गरजेचे आहे. ही माहिती अपडेट न झाल्यास संबंधित विक्रेत्याकडे मोठ्या प्रमाणावर खताचा साठा दिसून येतो. केंद्र सरकारकडूनदेखील खत असल्यानंतरही संबंधित जिल्ह्यातून मागणी कशी आली, याबाबत विचारणा होते. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
- किशोर पात्रीकर, प्रभारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo 7th Installment : शेतकऱ्यांना दिलासा; नमोच्या सातव्या हप्त्यासाठी १९३२ कोटी रुपये मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

Farmers Celebration: शेतशिवारात भरघोस धान्य पिकू दे!

Agriculture Technology: मजुरी, वेळेत बचत करणारे ऊसतोडणी यंत्र

Monsoon Rain Forecast: राज्यात २ दिवस पावसाची शक्यता; कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

Rain Crop Damage: खानदेशात पावसाने हानी, अनेक भागांत हजेरी

SCROLL FOR NEXT