Onion Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seedling Issue : कांदा रोपांच्या तुटवड्यामुळे शेतकरी चिंतेत

Farmer Issue : गारगोटवाडी, कडूस परिसरात परतीच्या पावसामुळे कांदारोपांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाच्या माऱ्याने रोपांची जागेवरच तूट होऊन मर वाढली आहे.

Team Agrowon

Kadus News : गारगोटवाडी, कडूस परिसरात परतीच्या पावसामुळे कांदारोपांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाच्या माऱ्याने रोपांची जागेवरच तूट होऊन मर वाढली आहे. बुरशी व करप्याने रोपे पिवळी पडली आहेत. लागवडीसाठी रोपांच्या तुटवडा भासणार आहे तसेच दरही वधारणार आहेत, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

खेड तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. बहुतेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. त्यात कापणीयोग्य व कापणी केलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्याचसोबत शेतकऱ्यांनी शेतातच रोपवाटिका करून जपलेल्या कांदारोपांचेसुद्धा मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी अतिपावसामुळे शेतात पाणी साचून राहिले. अशा ठिकाणी कांदारोपांवर बुरशीचे प्रमाण वाढले.

अनेकांनी सपाट वाफ्यावरच रोपनिर्मिती केली. अशा ठिकाणी  बुरशीची लागण कमी प्रमाणात झाली, परंतु पावसाच्या माऱ्याने रोपांची  मर वाढली. पावसाने झोडपल्याने काही शेतकऱ्यांच्या रोपवाटिकांचे पूर्णतः  नुकसान झाले.  शेतातील रोपवाटिकेत बीजांकुरण झाले होते. अशातच पाऊस आल्याने या अंकुरांचे नुकसान झाले. रोपांची तूट झाली. ही तूट आता भरून काढणे शक्य नाही. त्यावर फवारणी करूनही उपयोग नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

धुके, दवामुळे रोपे पडली पिवळी

रोपांमध्ये तणही झपाट्याने वाढले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून वातावरणात धुके व दव वाढले आहे. यामुळे रोपे  पिवळी पडली आहेत. रोपांवर करप्याचा प्रादुर्भाव दिसत आहे. पुढील काळात रोपांचा तुटवडा होऊन कांदा लागवडीबाबत शेतकऱ्यांसमोर अडचणी येतील, अशी स्थिती आहे. 

नव्याने रोपवाटिका तयार केल्यास लागवडीला विलंब होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पुढील पिकाच्या काळजीत शेतकरी व्यग्र आहे. यंदाच्या वर्षी कांद्याची लागवड कमी होईल, असे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT