Farmer is worried Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain Update: पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत

Maharashtra Rain : पिकाच्या संवेदनशील काळातच पावसाने दडी मारल्यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होत आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Nanded News : जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या तूफान पर्जन्यवृष्टीनंतर मागील १७ दिवसापासून पावसाने ओढ दिली आहे. पिकाच्या संवेदनशील काळातच पावसाने दडी मारल्यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होत आहे. पावसाची वाट बघत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात यंदा जून महिना कोरडा गेल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. यानंतर जूलैमध्ये झालेल्या पावसाने पेरण्या सूरु झाल्या. पेरण्यानंतर जिल्ह्याच्या अनेक भागात तुफान पर्जन्यमान झाले. यामुळे अनेक तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. तब्बल ८९ मंडळापैकी ८१ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती.

जुलैच्या २७ तारखेला जिल्ह्यात ढगफुटी सदृष्य परिस्थिती निर्माण होवून खरिपातील साडेचाल लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी २९ जुलै पासून पावसाने उघडीप दिली आहे. प्रारंभी पिकांना ताण आवश्यक होता. परंतु हा कालावधी पंधरा दिवसापेक्षा अधीक झाला आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटली आहे.

सध्या सोयाबीन पिकाला फुले येण्याचा कालावधी आहे. या काळात पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळाले तर उत्पादनात सात्यत टिकून राहते. अन्यथा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. भारतीय हवामान विभागाने १६ ऑगस्टपासून पावसाची शक्यता वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT