Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Issue : शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास शेतकरी नेत्यांना जाब विचारणार

Nagar Dharna Protest : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्त्वाखाली अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालायसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Nagar News : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्त्वाखाली अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालायसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना न केल्यास गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

घनवट म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग आलेला आहे. एकीकडे शेती व्यवसाय दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्ती यासारख्या संकटांचा सामना करत आहे. तर दुसरीकडे सरकार निर्यातबंदी, शेतमालाच्या साठ्यांवर मर्यादा, वायदे बंदी, बेसुमार आयत करून शेतीमालाचे भाव पाडत आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याऐवजी सरकार भीक दिल्यासारखे किरकोळ कर्जमाफी देत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. मात्र सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने या समस्या सोडविल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आल्याचे घनवट म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात काही प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहे. यामध्ये सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवून शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या

  • सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी.

  • शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा.

  • सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी.

  • शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा.

  • वन्य प्राण्यांकडून होणारे शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत.

  • शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पीक विमा मिळावा.

दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांच्या या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे. एक महिन्यात जर सरकारने वरील प्रश्न सोडविण्याबाबात काही उपाय केल्या नाही तर गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांना शेतकरी भर सभेत जाब विचारतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT