Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पीकहानी होऊनही शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर

Crop Damage Condition : गेल्या दोन महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Team Agrowon

Nagpur News : गेल्या दोन महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सर्वेक्षण करून शासन आपल्याला मदत करेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात अवकाळी आणि गारपिटीचा तीन वेळा तडाखा बसला. शेतातील पीक ऐन काढणीवर असताना पावसाने दगाफटका गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील सावनेर, काटोल, हिंगणा, नागपूर ग्रामीण, भिवापूर, उमरेड, मौदा, कुही, रामटेक आणि पारशिवनी तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

सावनेर तालुक्यात गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. याचा पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. कपाशी, गहू पिकांचे तर सर्वाधिक नुकसान झाले आहे. अवकाळी वादळी पावसामुळे शेतातील गहू, चना, तूर, कापूस, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले.

कापणीला आलेला गहू वादळी वाऱ्यामुळे लोटला. गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. हातात आलेला कापसाचा वेचा अवकाळी वादळी पावसात सापडल्याने तो ओला झाला. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता कापसाचा वेचा आला असताना तो सुद्धा पूर्णपणे पाण्यात सापडल्याने खराब झाला आहे. शेतकऱ्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पारशिवनी तालुक्यातील बोरडा गावासह परिसरातील शेतातील गहू, धान पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा शेतातील पाहणी करून तत्काळ योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी शेतकऱ्यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन गंभीर विषयावर चर्चा केली. भिवापूर, कुही आणि उमरेड तालुक्यातही पिकांची प्रचंड हानी झाली. मात्र, शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नाही.

सर्वेक्षण कधी होणार, मदत कधी मिळणार?

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या हानीची सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. दोन महिन्यांपासून सर्वेक्षण करण्यात यावी ही मागणी आहे. मात्र, अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाही. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सतत नापिकीचा त्रास सहन करावा लागत आहे.

सरकारही शेतकऱ्यांना मदत करीत नसल्यामुळे त्यांच्यासमोर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वेक्षण केले असते मदतीचा अंदाज आला असता. सर्वेक्षण न झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या असून मदत कधी मिळणार याची ते वाट पाहात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : नांदेडला ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत यंदाही घट

Solar Power : सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये होतेय सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Dairy App: जनावरांचं संपूर्ण नियोजन कसं करावं?

Varkhede Barrage : शेळगाव, वरखेडे प्रकल्पांत जलसंचय यंदाही १०० टक्के अशक्य

SCROLL FOR NEXT