Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Indapur Drought Update : इंदापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा; अन्यथा उपोषणाचा शेतकऱ्याचा इशारा

Drought Condition in Indapur : फेर सर्व्हे करून इंदापूर तालुक्यात अति गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी निरगुडे (ता इंदापूर) येथील शेतकरी भगवान बापू खारतोडे यांनी उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला.

Team Agrowon

Pune News : फेर सर्व्हे करून इंदापूर तालुक्यात अति गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी निरगुडे (ता इंदापूर) येथील शेतकरी भगवान बापू खारतोडे यांनी उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला.

याची प्रशासनाने तत्काळ दखल घेत खारतोडे यांना उपोषण न करण्याची विनंती केली. त्यावर खारतोडे यांनी आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा २३ नोव्हेंबरला आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

भिगवण सर्कलमध्ये अत्यल्प पाऊस होऊन देखील गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या अहवालानुसार बारामती तालुक्यात गंभीर दुष्काळ आणि शेजारच्या इंदापूर तालुक्यात अत्यल्प दुष्काळ असा विरोधाभास दिसत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात फेर सर्व्हे करून गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करावा.

तसेच चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरू करण्याची मागणी पूर्ण न झाल्यास २३ नोव्हेंबर पासून पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे भगवान खारतोडे यांनी सांगितले. याबाबतचे लेखी निवेदन खारतोडे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहे.

अति गंभीर आणि मध्यम यामध्ये शासनाने दिलेल्या सवलतीत फरक केलेला नाही. त्यामुळे अतिगंभीरच्या सवलती इंदापूर तालुक्यात मिळणार आहेत. तसेच पीक विम्याबाबतची कारवाई तालुकास्तरावरून पूर्ण करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी त्या स्वरूपाचा अहवाल दिलेला असून विमा कंपनीने या विरोधात विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केले आहे. त्याविषयी अद्याप निर्णय आलेला नाही. तो निर्णयही शेतकऱ्यांच्या बाजूनेच येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये.
- भाऊसाहेब रुपनवर, तालुका कृषी अधिकारी इंदापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Distillery Project : आसवनी प्रकल्पांच्या पाण्याचे वर्गीकरण वादात

Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’चे १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट

Quality Control Department Issue : ‘गुणनियंत्रण’च्या बदल्यांसाठी समुपदेशन हाच एकमेव पर्याय

SCROLL FOR NEXT