Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना ‘अवकाळी’च्या अनुदानाची प्रतीक्षा

Unseasonal Rain : नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ मध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या क्षेत्राला मदत देण्यासाठी ९५ कोटी ७२ लाख रुपयांच्या अनुदान मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

Team Agrowon

Jalna News : नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ मध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या क्षेत्राला मदत देण्यासाठी ९५ कोटी ७२ लाख रुपयांच्या अनुदान मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

मात्र नुकसान होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी नुकसानीचे अनुदान शासनाकडून मंजूर झालेले नाही. यामुळे अनुदान कधी मिळणार असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.

घनसावंगी तालुक्‍यात २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने सर्वदूर हजेरी लावली होती. या वेळी वेचणीचा कापूस झाडावरच होता. वेचणी झाली नव्हती. अचानक पाऊस आल्यामुळे हजारो क्विंटल कापूस पावसाने भिजला व त्याचा परिणाम उत्पादकतेसोबतच प्रतवारीवर झाला. कापसाचे मोठे नुकसान झाले होते.

यासोबतच तुरीच्या पिकालाही या पावसाचा जोरदार फटका बसला. रब्बीच्या हंगामातील गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त क्षेत्राचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले. तालुक्‍यात सुमारे ८९ हजार ४१० शेतकऱ्यांचे ५८ हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले होते.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनात वाढीव निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानीच्या क्षेत्रात वाढ करून ते दोनऐवजी तीन हेक्‍टर करण्यात आले असून अनुदानाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे.

त्यानुसार जिरायती शेतीसाठी ८ हजार ५०० रुपयांऐवजी १३ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्‍टरी १७ हजार रुपयांऐवजी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानभरपाईसाठी २२ हजार ५०० रुपयांऐवजी आता ३६ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT