Crop Insurance Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना नव्या सरकारची प्रतीक्षा

Crop Damage : जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईचे ३०८ कोटी २१ लाख रुपये सरकारकडे अडकले आहेत.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Dharashiv News : धाराशिव : जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईचे ३०८ कोटी २१ लाख रुपये सरकारकडे अडकले आहेत. दोन्ही महिन्यांतील भरपाईसाठी निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने उशिराने केल्यामुळे आधी हा निधी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकला तर आता निधीसाठी प्रशासनाला नव्या सरकारच्या स्थापनेची प्रतीक्षा करावी लागत आहेत.

दरम्यान निवडणूक काळात लोकप्रतिनिधींनी या मदतीला मुख्य सचिवांनी मान्यता दिली असून निवडणूक आयोगाच्या परवानगीने मदतीचे वाटप होणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात आचारसंहिता संपली तरी मदत न मिळाल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

अनुदान मंजूर करून भरपाईचे तातडीने शेतकऱ्यांना वाटप करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्याने जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला चार ऑक्टोबर रोजी परंडा, कळंब, धाराशिव, वाशी या तालुक्यांचा अनुदान प्रस्ताव पाठवला होता.

त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाने उमरगा आणि लोहारा या दोन तालुक्यांचा ८६ कोटी ४६ लाख रुपये अनुदानाचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र,  आचारसंहिता लागल्यानंतर या प्रस्तावास मंजुरी मिळू शकली नाही. सध्या हा प्रस्ताव राज्याच्या मुख्य सचिवांकडे आहे.
निवडणूक प्रचार सुरू असतानाच आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन निधीचे वितरण करण्याची तयारी मुख्य सचिवांनी केली होती. मात्र, आचारसंहिता संपली तरी त्याला यश आल्याचे दिसत नाही.

बाजूच्या लातूर जिल्ह्यात हे अनुदान मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. मात्र, धाराशिवमध्ये सुरुवातीपासूनच प्रशासनाकडून भरपाईसाठी निधीची मागणी उशिराने झाली. सुरुवातीला २२१ कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला. या प्रस्तावाला आचारसंहितेपू्र्वी मंजुरी देता आली असती. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या राहिलेल्या तालुक्यांचा व ऑक्टोबरमधील अतिवृ्ष्टीच्या भरपाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला. तो आचारसंहितेमुळे अडकला. आता  सरकार स्थापनेनंतरच मंजुरीचा मुहूर्त निघणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT