Water Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scheme : ‘आरफळ’च्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

आरफळ योजनेत कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव हे चार तालुके समाविष्ट आहेत.

Team Agrowon

Sangli Water Scheme News : गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढू लागली आहे. परिणामी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शेतीच्या पाण्याची टंचाई (Water Shortage) भासण्याचे संकेत मिळत आहेत. विहिरी, कूपनलिकांनी आताच तळ गाठल्याची परिस्थिती आहे.

त्यामुळे तासगाव, खानापूर, कडेगाव, तसेच पलुस तालुक्याच्या काही भागांत पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे आरफळ योजना सुरू (Arafal Water Scheme) करावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

आरफळ योजनेत कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव हे चार तालुके समाविष्ट आहेत. या तालुक्यांतील ३७ गावांना सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फायदा होतो. त्यामुळे या तालुक्यात ऊस पिकासह अन्य पिकांच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे.

दरवर्षी आरफळ योजना सुरू केली जाते. आरफळ योजनेचे पाणी येरळा नदीत सोडले जाते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होते.

सध्या या तिन्ही तालुक्यांतील मध्यम व लघु प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा आहे; मात्र, वाढत्या उन्हामुळे हा पाणीसाठा कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

ताकारी योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे याच तालुक्यांना दिसाला मिळाला आहे. मात्र, ताकारी योजनेपासून अनेक गावे वंचित आहेत. या वंचित गावांना आरफळ योजनेचे पाणी दिले जाते. त्यामुळे येथील द्राक्ष, ऊस शेतीला या योजनेचे शाश्वत पाणी मिळाले आहे;

मात्र, आरफळ योजना सुरू झाली नसल्याने या योजनेच्या लाभ क्षेत्रात असलेल्या गावांना अद्याप पाणी मिळालेले नाही. त्यामुळे आरफळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी होत आहे; मात्र, पाटबंधारे विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

पाणीटंचाईची शक्यता

या तिन्ही तालुक्यांत संपूर्ण क्षेत्र बागायत असल्याने शेतीला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. मात्र, यावर्षी आतापासूनच विहिरी, कूपनलिकांना पाणी कमी झाल्याने शेतीला तीव्र पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे.

‘आरफळ’च्या पाण्यामुळे ओलिताखाली येणारे क्षेत्र

तालुका - गावांची संख्या - क्षेत्र (हेक्टरमध्ये)

कडेगाव ४ ४७०

खानापूर ६ १९६०

पलूस ६ २३६९

तासगाव २१ ११९५९

एकूण ३७ १६७५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jowar Seed Subsidy Scheme: रब्बी ज्वारीच्या बियाणे खरेदीवर सरकारकडून मिळणार ५० टक्के अनुदान; कोणाला मिळणार लाभ? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

El Niño: तीव्र 'एल निनो'चं खरिपानंतर रब्बीवरही सावट, हवामान कसे राहील? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

Tamil Nadu Rain: तामिळनाडूत मुसळधार पाऊस, चेन्नई आणि चार जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील ९२ हजारांहून अधिक अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीची मागणी; १५ दिवसांची मुदत

Nashik Sugar Factory Crisis : ‘नासाका’चा १७ कोटींचा ऊस बिल घोटाळा? शेतकऱ्यांची थकीत पैशांसाठी चौकशीची मागणी!

SCROLL FOR NEXT