Heavy Rain Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Ahilyanagar Pre Monsoon Rains : मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Huge Losses Farmers : प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी क्रांतिसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी केली आहे.

Team Agrowon

Ahilyanagar Rain : अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी क्रांतिसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी केली आहे.

क्रांतिसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी, तहसीलदार व तालुका कृषी विभागाला ई-मेलद्वारे निवेदन देऊन मागणी केली आहे, की राहुरी तालुक्यातील कोंढवड व अन्य भागासह जिल्हाभरात मागील ५ ते ६ दिवसांपासून संततधार मॉन्सूनपूर्व पावसाचे सत्र सुरू आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घास पीक बियाण्यासाठी सोडले होते. यासाठी अळी, मावा, तुडतुडे व फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी विविध रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली.

यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च आला आहे. मात्र पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने लसूण घासच्या बियाण्याला काढणीपूर्वीच मोड फुटून ती बियाणे पूर्णतः निकामी झाली आहेत. परिणामी, या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मात्र, स्थानिक पातळीवर पंचायत समिती व महसूल विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. गावातील तलाठी यांना या बाबत कळवले असता, त्यांच्याकडे अशा प्रकारचे कोणतेही आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले. तरी आपले सरकार हे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे.

त्यामुळे मॉन्सूनपूर्व पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत.या मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर बनली असल्याने तालुक्यातील कोंढवड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT