Ahilyanagar Medical College : वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४८५ कोटी मंजुरी

Government Medical College : अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी ४८५.०८ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.
Government Medical College
Government Medical CollegeAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी ४८५.०८ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. मात्र या महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध झालेली नसून, त्या जागेच्या निश्‍चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

१०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने उभारण्यात येणार आहे. नवीन जागा निश्‍चित होऊन तिथे नवे बांधकाम होईपर्यंत हे रुग्णालय येथील शासकीय रुग्णालय आमच्या जागेतच सुरू राहणार असल्याचे अध्यादेशात नमूद केले आहे.

Government Medical College
Medical Hub : जळगाव ‘मेडिकल हब’च्या कामास गती

राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. अहिल्यानगर जिल्ह्यात सुयोग्य जागेअभावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आली नव्हती त्यानंतर पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेस अधिकाधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे महाविद्यालय व संलग्नित ४३८ रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास चौंडी येथे ६ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंजुरी देण्यात आली होती.

या बाबतचा शासनादेश २३ मे रोजी काढण्यात आला आहे. त्यात महाविद्यालय उभारणीसाठी ४८५.०८ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. महाविद्यालयासाठी सुयोग्य जागेची निवड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित जागा महसूल विभागाच्या सहमतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे निःशुल्क हस्तांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

Government Medical College
Medical Facility In School : शाळांत वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवा

तोपर्यंत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार महाविद्यालयासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जागेवर मनुष्यबळासह तात्पुरत्या स्वरूपात किमान ७ वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षण विभागास निः शुल्क वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच वा महाविद्यालयाच्या उभारणीसाठी प्रशासकीय इमारत, चिकित्सालयीन विभाग, रुग्णालयीन इमारत, अधिकारी-कर्मचारी आवास आणि विद्यार्थी वसतिगृह यांच्या बांधकामास तसेच यासाठी लागणारे अधिकारी-कर्मचारी यांची पदे भरण्यासही मान्यता दिली आहे.

शहराजवळच मिळणार जागा

नगर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराच्या परिसरात व्हावे, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय उत्तरेत नेले जाण्याची शक्यता गृहीत धरून सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत हे महाविद्यालय अहिल्यानगर परिसरात व्हावे अशी मागणी सुरू झाली खासदार नीलेश लंके यांनीही या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर परिसरातच वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध होणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com