Green Chilli Production Guidance Agrowon
ॲग्रो विशेष

Green Chilli Production : निर्यातक्षम मिरची उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत

Team Agrowon

Hingoli Chilli News : मिरची हा दररोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारे पीक आहे. काटेकोर पीक व्यवस्थापनातून निर्यातक्षम मिरची उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

मिरचीवर आधारित प्रक्रिया उद्योगातून मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांचा फायदा होईल असा सूर ‘‘मिरची : उत्तम कृषी पद्धती’’ या विषयावरील कार्यशाळेत उमटला. सहकार व पणन विभाग आणि आशियायी विकास बँक अर्थसाह्यित महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) व बी. पी. जी. फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि, दूरदर्शन प्रोड्यूसर कंपनी यांच्यातर्फे उमरा (ता. कळमनुरी) येथील उगम ग्राम

विकास संस्थेमध्ये सोमवारी (ता. ५) मिरची : उत्तम कृषी पद्धती यावर शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र अॅग्री बिजनेस नेटवर्क प्रकल्प विभागीय समन्वयक अरुण नादरे, मॅग्नेटचे शरद चोरे, बियाणे कंपनीचे डॉ. प्रवीण कुबडे, निर्यातदार प्रवीण वानखेडे, उगम संस्थेचे जयाजी पाईकराव, सुशीला पाईकराव, भास्कर पडुळ, सुशांत पाईकराव, विकास कांबळे, धनंजय पडघण, अनिशा दोडके, राम खंदारे आदी उपस्थित होते.

पापळकर म्हणाले, की मिरची हा मानवाच्या दररोजच्या आहारातील महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे ग्राहक दररोज मिरची खरेदी करतात. मिरची लागवडीतून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. गुणवत्तापूर्ण मिरचीच्या उत्पादनावर भर द्यावा लागेल. स्थानिक सरस वाणांचे संवर्धन करण्याची गरज आहे.

नादरे म्हणाले, की शेतकऱ्यांनी एफ. पीओच्या माध्यमातून शेतमाल विक्री करण्यासाठी पुढाकार घ्यावा. डॉ. कुबडे म्हणाले, की मिरची लागवडीसाठी रोपवाटीकेतून रोपे विकत आणण्यापेक्षा घरीच रोपे तयार केली पाहिजेत. शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Boar Control : रानडुक्कर नियंत्रणासाठी पर्यावरणस्नेही पद्धती

Vermicompost : अभियांत्रिकी प्राध्यापकाची दर्जेदार गांडूळ खत निर्मिती

Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांचा डेटा बेस तयार करा, जिल्हाधिकाऱ्यांची साखर कारखान्यांना सूचना

Ginger Crop : आले पिकावर ‘कंदकुज’चा प्रादुर्भाव, हजारो हेक्टर पिकाला फटका

Spices Industry : मसाले उद्योगात ‘सुजलाम्’ची भरारी

SCROLL FOR NEXT