MAGNET Project Agrowon
ॲग्रो विशेष

Magnet Project : शेतकऱ्यांनी ‘मॅग्नेट’ प्रकल्पाचा लाभ घ्यावा : डागा

Deputy Director Dinesh Daga : अकोला जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ‘मॅग्नेट’ प्रकल्पातील उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्पाचे उपसंचालक दिनेश डागा (अमरावती) यांनी केले.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ‘मॅग्नेट’ प्रकल्पातील उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्पाचे उपसंचालक दिनेश डागा (अमरावती) यांनी केले.

सहकार व पणन विभागातंर्गत आशियायी विकास बँक अर्थसहाय्यित ‘महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पां’तर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे व अकोला कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘केळी- उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण’ वर्गाचे आयोजन पणज (ता. अकोट) येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी संचालक डॉ. एच. पी.सिंग (दिल्ली), श्री. डागा, मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप (महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, पुणे), जैन इरिगेशनचे डॉ. के बी. पाटील, तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे, कृभकोचे विभागीय व्यवस्थापक जितेंद्र भामरे,

‘पंदेकृवि’चे सहायक प्रा. डॉ. नरेंद्र रामटेके, डॉ. गजानन पाचघरे, श्रीमती मयुरी मिसाळ, निखिल धानोरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. लिंग समानता व सामाजिक समावेषण याविषयी श्रीमती मिसाळ यांनी माहिती दिली. हेमंत जगताप यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT