MAGNET Project : मॅग्नेट सारख्या प्रकल्पात येणाऱ्या अडचणी सोडवणार ः अब्दुल सत्तार

Abdul Sattar : राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया आणि निर्यातीला प्रोत्साहन देत संस्था आणि शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी मॅग्नेट सारखे प्रकल्प राबविण्यात येत आहेत.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

Pune News : राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया आणि निर्यातीला प्रोत्साहन देत संस्था आणि शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी मॅग्नेट सारखे प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

हे प्रकल्प राबविताना संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून पणन कायद्यात काळानुरूप बदल देखील करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार दिली.

आशियाई विकास बँक (एडीबी)च्या सहकार्याने राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थेसाठी आयोजित तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी बुधवारी (ता. १७) ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, उपप्रकल्प संचालक नितीन पाटील, आशियाई विकास बँकेचे क्रिशन रौटेला, राघवेंद्र नदुविनामनी, केपीएमजीच्या सहयोगी संचालक मेघना पांडे, विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Abdul Sattar
Agriculture Irrigation Scheme : परभणी जिल्ह्यातील लाभार्थींना ३८ लाखांवर अनुदान वितरित

पणन मंत्री सत्तार म्हणाले की, राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे, त्यांच्या शेतमालाला देश व विदेशात योग्य प्रकारे भाव मिळाला पाहिजे, नाशवंत मालाला मंदीच्या काळात साठवणूक करता यावी, शेतीमालाची आयात-निर्यात सुलभरीत्या करता यावी यासाठी शेतकरी हिताचे कायदे तयार करण्यात येत आहेत. विद्यमान नियमात काळानुरूप बदलही करण्यात येत आहेत.

फलोत्पादन पिकांची स्थानिक बाजारपेठ, प्रक्रिया व निर्यातीसाठी असलेली संधी पाहता वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था व मूल्यसाखळी गुंतवणूकदार यांना फलोत्पादन पिकांच्या सुधारित जाती, काढणीपश्चात व्यवस्थापन, पायाभूत सुविधांची उभारणी व बाजारपेठेबाबत माहिती आदींबाबत अद्ययावत माहिती व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान अवगत असणे ही काळाची गरज आहे.

Abdul Sattar
Agriculture Technology : आधुनिक तंत्रज्ञानासह जोडधंद्याचा अंगीकार करा

यादृष्टीने विविध प्रशिक्षण आयोजित करून त्यांना मार्गदर्शन करावे. शेतकरी उत्पादक संस्थांची निवड करुन विदेशात त्यांचे अभ्यास दौरे आयोजित करावेत, राज्यातील शेतकरी सक्षम झाल्यास देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल, असेही श्री. सत्तार म्हणाले.

प्रकल्प संचालक कोकरे यांनी मॅग्नेट प्रकल्पाविषयी माहिती दिली. या वेळी श्री. सत्तार यांच्या हस्ते कृषी तंत्रज्ञान कार्यशाळा- मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत नवीन व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी अर्थसाहाय्य या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

अकराशे कोटींचा मॅग्नेट प्रकल्प

फलोत्पादन क्षेत्रातील कृषी व्यवसायाला चालना देण्याकरिता १ हजार १०० कोटी रुपयांचा महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, क्षमता विकास करणे, फलोत्पादन व फुल पिकांची गुणवत्ता तसेच उत्पादन वाढ करणे व साठवणूक करणे तसेच प्रक्रियेसाठी पायाभूत सुविधा उभारणी करणे या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना ६० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊन या प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सत्तार यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com