Crop Insurance Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : शेतकऱ्यांना नुकसानीचा अग्रिम पीकविमा १५ दिवसांत मिळावा : धंनजय मुंडे

Agriculture Minister Dhananjay Munde : १५ दिवसांत शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रीम पीकविमा मिळावा, असे निर्देश कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धंनजय मुंडे यांनी सोमवारी (ता. ९) बैठकीत दिले.

Team Agrowon

Beed News : मागील काही दिवसांत झालेल्या सततच्या पावसाच्या पाण्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने त्याचे सॅम्पल सर्व्हे विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्तरित्या ८ दिवसांत पूर्ण करावेत. त्यापुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रीम पीकविमा मिळावा, असे निर्देश कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धंनजय मुंडे यांनी सोमवारी (ता. ९) बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, ॲड. राजेश्वर चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह विमा कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी पीकविमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना पुढील आठवडाभरात कृषी विभागाच्या सहकार्याने नमुना सर्वेक्षण करून त्याच्या पुढील १५ दिवसांत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळण्याबाबत सूचना केल्या.

नमुना सर्वेक्षण करताना कुठलेही चूक अथवा दुर्लक्ष विमा कंपन्यांकडून झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले करावेत, असेही निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी या वेळी दिले. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या सर्व महसूल मंडलांतील नुकसानीच्या भरपाईचे नैसर्गिक आपत्ती अनुदान मागणीचे अहवाल राज्य शासनास तत्काळ सादर करावेत, असेही निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनास दिले.

‘लाडकी बहीण’ योजनेचा घेतला आढावा

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेचा आढावा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या वेळी घेतला. जिल्ह्यातील एकूण ६ लाख ४१ हजार १४७ महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. यापैकी ६ लाख १६ हजार ७८८ महिलांचे अर्ज मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. पाठक यांनी श्री. मुंडे यांना दिली. १२ हजार ६११ अर्जांवर मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ११ हजार ७४८ अर्ज विविध कारणांनी प्रलंबित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. उर्वरित अर्जांमधील त्रुटी लवकर दूर करून त्यांनाही मंजुरी देण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी या वेळी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT