Banana Agrowon
ॲग्रो विशेष

Exportable Crop : शेतकऱ्यांनी निर्यातक्षम पिकांचे उत्पादन घ्यावे

शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकातून बाहेर येऊन दर्जेदार निर्यातक्षम केळी, हळद व फळ पिकांचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

Team Agrowon

Nanded News : शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकातून बाहेर येऊन दर्जेदार निर्यातक्षम केळी (Banana), हळद (Turmaric) व फळ पिकांचे उत्पादन (Exportable Crop Production) घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

नांदेडमधील नवा मोंढा मैदानात आयोजित पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाच्या (Agricultural Festival) उद्‌घाटनानंतर राऊत बोलत होते.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. मानसी पाटील, डॉ. प्रीतम भुतडा, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी चंदनसिंग राठोड, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. अरविंद पांडागळे, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवने, उपविभागीय कृषी अधिकारी सुरेंद्र पवार, अनिल शिरफुले, श्री रणवीर, पूनम पवार, न्या. दरजीत कोर, पंडीत मोरे, डॉ. विठ्ठल पावडे, एलडीएम अनिल गचके, पंडीत मोरे, रमेश देशमुख, डॉ. देविकांत देशमुख, प्रल्हाद इंगोले आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, की जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवाला भेट देऊन नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, आपल्या उत्पादनावर प्रक्रिया करून कृषी उद्योजक बनावे, ब्रँडिंग करावे व स्वतः गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत आपल्या शेतीमालाची विक्री करावी.

यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी व स्मार्ट या योजनांचा लाभ घ्यावा. रविशंकर चलवदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पांडागळे, डॉ. मानसी पाटील, डॉ. प्रीतम भुतडा यांनी मार्गदर्शन केले.

आजचे चर्चासत्र

नेसर्गिक शेतीविषयी विश्‍वनाथ होळगे, गांडूळ खताविषयी बळवंत पोळ, सेंद्रिय निविष्ठा विषयी भगवान इंगोले, सेंद्रीय शेती प्रमाणीकरणाविषयी डॉ. मानसी पाटील पुणे, महिला एक जबाबदार नेतृत्वाविषयी प्रा. घनश्याम येळणे, चंद्रकला बुक्तरे, सुषमा देव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध

Jalgaon Flood: जळगावमधील पाचोऱ्यात पावसामुळे पूरस्थिती; गिरीश महाजनांचे प्रशासनाला मदतीचे निर्देश

Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टी

E-Peek Pahani : खरिपातील ४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांना फटका

SCROLL FOR NEXT