Radhakrishana Vikhe Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology : शेतकऱ्यांना परवडणारे तंत्रज्ञान द्यावे

Team Agrowon

Akola News : सर्वसामान्य शेतकऱ्यांना आज खासगी कंपन्यांचे नवतंत्रज्ञान परवडणारे आहे काय. तो त्याची किंमत चुकवू शकतो काय? ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांना परवडणारे तंत्रज्ञान देण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन खात्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शुक्रवार (ता. २०) पासून सुरू असलेल्या शिवारफेरीच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. या वेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, शालिनी विखे पाटील यांच्यासह आमदार, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, विद्यापीठाचे विविध विभागप्रमुख, अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

विखे पाटील पुढे म्हणाले, की विद्यापीठांमध्ये आज उपक्रमशीलता कमी होत आहे. अशा परिस्थितीत या विद्यापीठाने आयोजित केलेली ही प्रात्यक्षिकासह असलेली शिवारफेरी कौतुकास्पद आहे. आज कृषी क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. प्रयोग होत आहेत. पण हे जितक्या वेगाने सुरू आहे, ते पाहता खासगी कंपन्यांचे तंत्रज्ञान, वाण शेतकऱ्यांना परवडणारे आहेत काय, त्याची किंमत वाजवी आहे काय याचा विचार करावा.

तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहचेपर्यंत त्याची फसवणूक होणार नाही हे बघावे लागेल. शेतकरी बाराही महिने राबतो. त्याला कुठला वेतन आयोग नाही. तो जगाच्या भल्यासाठी राबत असतो. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान देण्याची भूमिका विद्यापीठांनी घेतली पाहिजे. परवडणारे तंत्रज्ञान देण्याचे काम हातात घ्यावे.

आज विद्यापीठांनी तंत्रज्ञान प्रसाराचा वेग वाढवण्याची गरज आहे. सध्या कार्यरत असलेले कृषी विज्ञान केंद्र, टीसीएफ यांच्या माध्यमातून हे पोचवण्याचा वेग वाढवावा. कृषी विभाग डिजिटल प्लॅटफॉर्मवर आले आहे. शेतकरी त्याचा वापर करतो आहे. कृषी विद्यापीठांनीही आता डिजिटल धोरण अंगीकारावे. विस्ताराचे काम वाढवावे.

कृषी तंत्रज्ञान, प्रयोग हे ऑनलाइन उपलब्ध करून दिले पाहिजेत, असेही विखे पाटील म्हणाले. कुलगुरू डॉ. गडाख यांनी पंदेकृवि राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विलास खर्चे यांनी आभार मानले.

केव्हीके, टीसीएफवर नाराजी

विखे पाटील यांनी सध्याच्या कृषी विज्ञान केंद्रांबाबत टीका करत हे केव्हीके केवळ आयसीआयआरच्या पगारासाठी चालतात असे सांगत तेथे कुठले प्रयोग होत आहेत, असा प्रश्‍न विचारला. तसेच कृषी खात्याअंतर्गत कार्यरत असलेल्या टीसीएफवर नाराजी व्यक्त केली. या जमिनी विद्यापीठांना हँडओव्हर करून तेथे प्रयोग झाले पाहिजेत, असे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Revenue Department : दीडशे गावांची जबाबदारी अवघ्या १२ तलाठ्यांवर

Water Scarcity : टॅंकरला विश्रांती, पण टंचाईचे ढग कायम

Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत सध्याचे टोमॅटो दर ?

Soybean Crop : चार एकरावरील सोयाबीन पिकावर फिरवला रोटाव्हेटर

Mahatma Phule Crop Loan Scheme : पीक कर्ज परतफेड केली; आम्हालाही लाभ द्या, वंचित शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT