Agot Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Preparation: अगोट खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

Vikramgad Market : पावसाळ्यासह दैनंदिन लागणाऱ्या रोजच्या आहारातील वस्तूंची साठवण करण्यासाठी गाव-खेड्यांतील शेतकरी विक्रमगडच्या बाजारात दाखल होत आहेत.

Team Agrowon

Vikramgad News: पावसाळ्यात शेती हंगामात न मिळणाऱ्या वस्तू, तसेच त्या वेळी अनेक वस्तूंचे भाव चढे असतात. पावसाळ्यासह दैनंदिन लागणाऱ्या रोजच्या आहारातील वस्तूंची साठवण करण्यासाठी गाव-खेड्यांतील शेतकरी विक्रमगडच्या बाजारात दाखल होत आहेत.

कांदा, बटाटा, लसूण, तिखट मिरची, हळद आणि कडधान्य खरेदी करताना दिसत आहेत. अवकाळी पावसामुळे आठवडा बाजाराला व्यत्यय येत होता, मात्र तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या विक्रमगडच्या बाजारपेठेत गर्दी होत आहे. कांद्याच्या गोण्याच्या गोण्या खरेदी करताना दिसत आहेत.

शेतीचा हंगाम चालू झाल्यावर बाजारहाट (खरेदी) करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने अगोटची खरेदी केली जात आहे. येथील शेतकरी पावसाळ्याच्या हंगामाला अगोट म्हणून संबोधतात. तसेच तीन ते चार महिने पुरेल असा साठा करून ठेवतो.

सध्या बाजारात कांदा, लसूण, बटाटे, तिखट मिरची, हळद कमी भावात उपलब्ध आहे. याच वस्तूंचा भाव पावसाळ्यात वाढलेला असतो. त्यामुळे पावसाच्या पूर्वी खरेदी केली जाते. पावसाळा जवळ आल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी अगोटच्या खरेदीला सुरुवात केली आहे.

माॅन्सूनपूर्व खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडताना दिसत आहे. पावसाचे चार महिने पाऊस चालू झाल्यावर भाजी आणण्यापासून ते सर्वच गोष्टींकरिता अडचणी निर्माण होतात, कारण ग्रामीण भागात पावसाळ्यात या वस्तू सहज मिळत नसतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT