Farmers  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Security Act : देशात शेतकरी संरक्षण कायदा हवा

Agriculture Act : आपल्या देशामध्ये शेतकरी वाचविण्यासाठी अधिकृत शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे.

Team Agrowon

Nagar News : आपल्या देशामध्ये शेतकरी वाचविण्यासाठी अधिकृत शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे. त्यासाठी भारतीय जनसंसद यांच्या मार्फत शेतकरी संरक्षण कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी कृषी वैज्ञानिक व कायदेतज्ज्ञ डॉ. मुकुंदराव गायकवाड, भारतीय जनसंसदेचे राज्य अध्यक्ष अशोकराव सब्बन यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे, असे कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी सांगितले.

भारतीय जनसंसदच्या पदाधिकाऱ्यांची नगर येथे बैठक झाली. या बैठकीत शेतकरी संरक्षण कायद्यावर चर्चा करण्यात आली. वैज्ञानिक व कायदेतज्ज्ञ डॉ. मुकुंदराव गायकवाड, भारतीय जनसंसद राज्य अध्यक्ष अशोकराव सब्बन, कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांच्यासह पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. भारत देशामध्ये शेतकऱ्यांना अत्यंत तुच्छ वागणूक मिळत आहे.

शेतीमालाला भाव नाही आणि शेतकऱ्यांना जगण्याचा सन्मानही नाही. त्यामुळे दररोज आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. देश स्वतंत्र झाला तेव्हाच शेतकऱ्यांना सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी कायदा करणे गरजेचे होते, मात्र दुर्दैवाने तसेच झाले नाही. ग्राहक संरक्षण कायदा व पत्रकार संरक्षण कायदा तसेच डॉक्टरांना संरक्षण कायदा केला गेला आहे.

परंतु बहुजन ६३ टक्के शेतकरी या संरक्षण कायद्यापासून वंचित राहिले आहेत. दुर्दैवाने देशातील शेती व्यवसाय वाचवा असा टाहो फोडण्याची वेळ आली आहे. त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना विशेष मूलभूत हक्क दिले गेले पाहिजेत. आणि त्यासाठीची वैचारिक तात्त्विक मार्गदर्शन तत्त्वे ठरविणे काळाची गरज आहे.

शेती संरक्षण कायदा तयार करण्यासाठी व त्याचा मसुदा उत्तम कायदा व्हावा यासाठी भारतीय जनसंसद व्यासपीठावरून कृती करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय जनसंसदेने काम हाती घेतले. शेतकरी, नागरिकांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. अशोक ढगे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT