Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Cloudy Weather : ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांची तारांबळ

Paddy Harvesting : भोर तालुक्यात भात हेच प्रमुख पीक असून भात काढणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : भोर तालुक्यात सध्या भात काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. परंतु शुक्रवार (ता. १५) सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याने कोणत्याही क्षणी पाऊस पडेल या भीतीने शेतात कापून ठेवलेले भात भिजू नये म्हणून कापलेले भात गोळा करून सुरक्षित ठिकाणी ठेवताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असल्याचे पाहायला मिळाले.

भोर तालुक्यात भात हेच प्रमुख पीक असून भात काढणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. पश्‍चिम भागातील नांदगाव, वाठार, पिसावरे, वेनवडी, शिरवली तसेच आंबवडे खोऱ्यातील ज्या शेतकऱ्यांचे दोन दिवसांत भात कापून वाळण्यासाठी खाचरातच होते.

ढगाळ वातावरणामुळे ते भिजू नये म्हणून हातातील इतर कामे सोडून शेतकरी खाचरातील कापलेले भात गोळा करून ट्रॅक्टर, बैलगाडीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी नेताना त्यांची धांदल उडाली.

तर काहींनी कापलेले भात खाचराजवळच एकत्र रचून प्लास्टिक कागदाने झाकतानाची लगबग दिसून येत होती.

तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी मजूर व यंत्राअभावी कापलेल्या भाताच्या झोडणी न करताच गंजी रचल्या आहेत. ढगाळ हवामानामुळे पावसाच्या भीतीने गंजी प्लास्टिक कागदाने झाकण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement: ‘सीसीआय’तर्फे परभणी, मानवतमध्ये कापूस खरेदी सुरू

Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी कायम

Agriculture MSP: शनिवारपासून सोयाबीन, मूग, उडीद हमीभावाने खरेदी सुरू!

Weather Update: महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; उत्तरेकडील जिल्ह्यांत तापमान घसरले

Market Update: सोयाबीनचा दर टिकून, मुगावर दबाव कायम

SCROLL FOR NEXT