Water Project
Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Vaan Water Project : शेतकरी पाणी परिषदेने भरला शेतकऱ्यांमध्ये हुंकार

Team Agrowon

Akola Irrigation News : तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पामधील पाणी पिण्यासाठी विविध भागांत पळविण्याचा घाट घातला जात आहे. मात्र याबाबतचे कायदे तुमच्या बाजूने आहेत. तुम्ही त्यासाठी लढलेच पाहिजे, असे मत रविवारी (ता. १६) येथे झालेल्या शेतकरी पाणी परिषदेत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले.

लोकजागर मंचाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या पुढाकाराने ही परिषद झाली. या वेळी पाणी परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध जल अभ्यासक व लेखक सुधीर भोंगळे होते.

परिषदेला अनिल गावंडे, प्रदीप पुरंदरे, विलास भोंगाडे, प्रतिक उंबरकार, आशिष चंदाराणा, भगवान केशभट यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी श्री. पुरंदरे म्हणाले, ‘‘नऊ सिंचनविषयक कायदे आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कायद्यांना नियम नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.’’

विलास भोंगाडे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना काय पाहिजे, याबाबत सरकारला काही देणेघेणे नाही. त्यामुळे वाणच्या पाण्यासह इतर प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या भागातील लोकप्रतिनिधी गप्प आहेत. आमदार-खासदारांना या भागातील शेतकऱ्यांनी जाब विचारला पाहिजे.’’

तर जलसंवर्धन व पर्यावरणवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते भगवान केशभट म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना विचारात न घेता शासनाची दंडेलशाही चालू आहे. ती थांबविण्यासाठी सर्वांनी सामूहिकरीत्या प्रयत्न करण्याची गरज आहे.’’

आशिष चंदाराणा म्हणाले, की अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना वीज जोडणी लवकरात लवकर कशी मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत.’’

भूजल अभ्यासक प्रतीक उंबरकार यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. अनिल गावंडे म्हणाले, ‘आपापल्या भागामध्ये पाण्याचे स्रोत उपलब्ध असताना दूरवरून वाण धरणातून पाणी नेण्याचा घाट जर कोणी घालत असेल तर धरणासाठी ज्या शेतकऱ्यांची शेती गेली त्यांचे नुकसान होऊ देणार नाही.

धरणालगतीची गावे पाण्यापासून वंचित आहेत. हा गंभीर प्रश्‍न आहे.’’ सूत्रसंचालन महेंद्र कराळे यांनी केले, तर आभार मनीष भांबुरकर यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT