Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : अमळनेर तालुक्यातील शेतकरी दोन वर्षांपासून भरपाईच्या प्रतीक्षेत

Crop Damage : दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अथवा शासन अनुदान अद्याप मिळालेले नाही.

Team Agrowon

Jalgaon News : दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अथवा शासन अनुदान अद्याप मिळालेले नाही. ते तत्काळ मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. २०२१ मध्ये ८ सप्टेंबर आणि १ व २ ऑक्टोबला अवकाळी अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

१७० हेक्टर उडीद , २,३०६ हेक्टर मका , ६०६ हेक्टर ज्वारी, २७५ हेक्टर सोयाबीन, ३५ हेक्टर तीळ, २१२ हेक्टर बाजरी, ११ हेक्टर भुईमूग, ४३ हजार २५१ हेक्टर कापूस २ हेक्टर सुर्यफूल पिकांचे नुकसान झाले होते.

त्यात ६१ हजार १६९ शेतकऱ्यांचे ४६ हजार८७० हेक्टर क्षेत्र जिरायती पिकाखालील क्षेत्राचे, तर ७९५ शेतकऱ्यांचे ३४४ हेक्टर बागायती आणि १०७ शेतकऱ्यांच्या फळपिकांचे ६८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते.

या संदर्भात नुकसानीचे पंचनामे करून तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांनी ३२ कोटी ४६ लाख रुपये अपेक्षित निधीचा अहवाल देखील पाठविला होता. मात्र आजपर्यंत नुकसान भरपाई अथवा मोबदला मिळालेला नाही. तरी २० ते २५ दिवसांच्या आत नुकसानीचा मोबदला आमच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावा.

अन्यथा पूर्वसूचना न देता कोणत्याही क्षणी प्रांत कार्यालयाबाहेर उपोषणाला बसू असा इशारा दिलीप पाटील, मधुकर पाटील, बुधा मोरे, अशोक साळुंखे, प्रकाश पाटील, भगवान पाटील, भूषण साळुंखे, घनश्याम पाटील, पांडुरंग पाटील, विश्वास पाटील, राजेंद्र कोळी, सुरेश लोहार, रोहिदास पाटील, जिजाबरव पाटील, रमेश साळुंखे, चंद्रकांत चौधरी, योगेश बडगुजर, पुरुषोत्तम पाटील, बाबुराव पाटील, भाईदास पारधी, जिजाबरव जगताप, अशोक लोहार, हिंमत साळुंखे, शरद पाटील यांच्यासह अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, कृषी अधिकारी, तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत.

नुकसानग्रस्तांचा उपोषणाचा इशारा

तहसीलदार व कृषी विभागाने ३२ कोटी ४६ लाख रुपये अपेक्षित निधीचा अहवाल पाठविला होता. मात्र आजपर्यंत नुकसान भरपाई अथवा मोबदला मिळालेला नाही. तरी २० ते २५ दिवसांच्या आत नुकसानीचा मोबदला आमच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावा; अन्यथा प्रांत कार्यालयाबाहेर उपोषणाला बसण्याचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT