Farmer Identification Number Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Identification Number : कृषी योजनेच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक

Agriculture Scheme : राज्यात शेतकऱ्यांसाठी अॅग्रिस्टॅक संकल्पना राबविणेस मान्यता दिली आहे. अॅग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा व डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे.

Team Agrowon

सातारा :  राज्यात शेतकऱ्यांसाठी अॅग्रिस्टॅक संकल्पना राबविणेस मान्यता दिली आहे. अॅग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा व डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे.

कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारीत योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होणार आहे. तरी या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती प्रक्रियेस गतिमान करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांची मदत घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक व ग्राम विकास अधिकारी या क्षेत्रीय कर्मचारी यांच्या मार्फत गाव पातळीवर शेतकऱ्यांच्या बैठका, कॅम्प घेऊन त्यामध्ये शेतकऱ्यांना या उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

योजनांच्या लाभासाठी ओळख क्रमांक बंधनकारक
पीएम किसान, पीक विमा, नुकसान भरपाई तसेच कृषी विभागाच्या सर्व वैयक्तिक लाभाच्या योजना, आदी लाभासाठी सर्व शेतकऱ्यांना त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक केले जाणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी गाव पातळीवरील सदर कॅम्पमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही श्रीमती फरांदे यांनी केले आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक किंवा ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Microfinance Loan: सूक्ष्म कर्जाचा विळखा मोठा

Agrotech 2025: कृषी विद्यापीठातर्फे अकोल्यात आजपासून प्रदर्शन

Soil Degradation Issue: खत पिशवीवर तांत्रिक माहिती नसल्याने माती ऱ्हासाचा धोका

Kidney Sale Case: पंजाबचा हिमांशू किडनी विक्री प्रकरणात होता कार्यवाहक

Farm Equipment: खेड तालुक्यात ‘महाडीबीटी’तून ट्रॅक्टर, शेती अवजारांचे वाटप

SCROLL FOR NEXT