
Parbhani News : केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यासाठी सोमवार (ता. १६) पासून मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोहिमच्या दिवशी ओळख क्रमांक घ्यावा लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.
केंद्र शासनाची अॅग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रीकल्चर) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरीत्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करणे.
केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे. स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोईस्कर प्रवेश मिळवून देणे.
शेतकऱ्यांची ओळख पटविण्याची पारदर्शक व सोपी पद्धत, प्रमाणीकरणाची सुलभ पद्धत विकसित करणे, शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे. उच्च-गुणवत्तेचा डेटा व अॅग्री टेकद्वारे कृषी उत्पादने तसेच सेवांमध्ये नवकल्पना वाढविणे ही योजनेची उद्दिष्टे आहेत.
या योजनेमुळे पीएम किसान योजनेतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल. पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास साह्य मिळेल. पीककर्ज, किसान क्रेडिट कार्ड, कृषी पायाभूत सुविधा निधी, शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करून घेण्यात सुलभता राहील.
पीकविमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत देय नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत शेतकरी नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होऊ शकेल.
लाभार्थ्याची वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्यांना वेळेवर कृषिविषयक सल्ले, विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नावीन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार-प्रचारात सफलता प्राप्त होईल. मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.