Urea Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Urea Shortage : युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा

Fertilizer : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात यंदा खरीप हंगामासाठी योग्य पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी केली आहे.

Team Agrowon

Baramati News : सुपे येथील खरेदी-विक्री संघाच्या दुकानांसह खासगी दुकानांत युरिया आल्याचे समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी युरिया खरेदीसाठी दुकानासमोर रांगा लावल्या. मात्र युरिया संपल्यानंतर काही शेतकरी युरियाच्या प्रतिक्षेत राहिले.

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात यंदा खरीप हंगामासाठी योग्य पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी केली आहे. सध्या शेतकरी बाजरी व मका पिकाला युरियाची मात्रा देत आहेत. त्यामुळे युरियाची मागणी वाढली आहे.

दोन दिवसांपूर्वी बारामतीसह सुपे व उंडवडी येथे युरिया मिळत नव्हता. त्यामुळे सुपे येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर तत्काळ तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी सुपे येथील दुकानांची तपासणी करून पंचनामा केला. याचा अहवाल अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविला. त्यामुळे युरियाची कृत्रिम टंचाई करणाऱ्या खत विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

कृषी विभागाच्या वतीने बारामती तालुक्यासाठी युरियाची अधिकची मागणी करण्यात आली. त्यानुसार ७०० टन युरियाची उपलब्धता होणार आहे. सुपे येथील खरेदी-विक्री संघासह येथील दोन दुकानांत शुक्रवारी युरियाची विक्री सुरू होती. हे समजताच शेतकऱ्यांनी युरिया खरेदीसाठी सकाळपासून रांगा लावल्या.

बांदल म्हणाल्या, ‘‘कृषी सहाय्यकांना संबंधित गावात खत विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमून दिले आहे. जिल्ह्यात ३ हजार टन युरिया उपलब्ध होणार आहे. यापैकी बारामती तालुक्याला ७०० टन युरिया मिळेल. त्यामुळे टंचाई जाणवणार नाही. विक्रीबाबत काही गैरप्रकार झाल्यास तत्काळ कळवावे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming: एका देशी गाईवरही करता येणार नैसर्गिक शेती: शहा

Farmer Issue : सहा क्विंटल २१ किलो कांदा विक्रीतून मिळाला शून्य रुपया

PM Mitra Project: पीएम मित्रा मेगा टेक्स्टाईल पार्क अद्याप कागदावरच

Gulf Food Expo: ‘ॲग्रोवन’समवेत चला ‘गल्फ फूड एक्स्पो’ला

Indian Agri Cooperatives: देशात २५ टक्केही शेतकरी सहकाराशी जोडलेले नाहीत

SCROLL FOR NEXT