Ravikant Tupkar
Ravikant Tupkar agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : '...तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पोरं मंत्र्यांच्या वाहने अडवणार'

sandeep Shirguppe

Maharashtra News : राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे. मागच्या चार महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्याच केल्या नसल्याने खरिप हंगाम धोक्यात आला आहे.

याचबरोबर पावसाअभावी सोयाबीन, कापूसासह अनेक पीके धोक्यात आली आहेत. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीचे बुलडाणा जिल्ह्यातील नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला इशारा दिला आहे.

राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी अस्मानी संकटामुळे पिकांवर पडलेल्या रोगांमुळे मोठा आर्थिक अडचणीत सापडला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याचा सर्वात मोठा फटका त्याच्या उत्पादनावर पडणार आहे.

खर्च दुप्पट तर उत्पादन अत्यल्प, तसेच भाव सुद्धा मिळणार नाही. यामुळे शेतकरी आत्महत्येच्या पर्यायाला जवळ करत आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांना काही घेणे देणे नाही का? असा सवाल रविकांत तुपकर यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीन उत्पादन करणारे शेतकरी आहेत. सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सुमारे ६० ते ७० टक्के पीक वाया जाण्याची परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे सोयाबीनला पिकाला योग्य भाव मिळत नसुन सोयाबीनचे भाव पडले आहेत.

ज्याप्रमाणे महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या, त्याचप्रमाणं संपूर्ण महाराष्ट्रात आगामी काळात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पोरं मंत्र्यांच्या वाहने अडवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Session 2024 : मुसळधार पावसाचा अधिवेशनाला फटका; आमदारांसह मंत्र्यांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Tax on Robot : यंत्रमानवांवर कर आकारण्याचा इरादा

Nilesh Lanke Protest : विखेंच्या आश्वासन, लंकेंचं आंदोलन स्थगित; जयंत पाटलांच्या मध्यस्तीनंतर निर्णय

Indian Politics : दोघांमधील संघर्षाला अवास्तव महत्त्व

Maize Market : मक्यातील विक्रमी तेजी टिकून राहणार का?

SCROLL FOR NEXT