Soybean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : सोयाबीन दरावरून मध्य प्रदेशातील शेतकरी आक्रमक

Soybean Update : सोयाबीनला सहा हजार रुपयांचा भाव मिळावा याकरिता मध्य प्रदेशातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : सोयाबीनला सहा हजार रुपयांचा भाव मिळावा याकरिता मध्य प्रदेशातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्या अंतर्गत सुरुवातीला सोशल मीडिया मोहीम व आता मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांना पाच हजार गावांतून निवेदन दिली जाणार आहेत. त्याची दखल न घेतल्यास ८ व ९ सप्टेंबर रोजी शेतकरी संघटनांची बैठक होऊन त्यात आंदोलनाची पुढील दिशा निश्‍चित केली जाणार आहे.

२०२३-२४ या वर्षात सोयाबीनच्या दरात मोठी पडझड नोंदविण्यात आली. केंद्र सरकारकडून सातत्याने खाद्यतेल, डिओसी आयातीवर भर देण्यात आला. त्याच्या परिणामी देशाअंतर्गंत बाजारात सोयाबीनचे दर दबावात राहिले. ३,९०० ते ४,००० याच दराने सोयाबीनचे व्यवहार झाले. यातून उत्पादकता खर्चाची भरपाई देखील झाली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे गेल्या हंगामात ४,६०० रुपयांचा हमीभाव सोयाबीनला होता. त्यात २९२ रुपयांची वाढ करीत २०२४-२५ या वर्षाकरिता ४,८९२ रुपये असा दर जाहीर करण्यात आला आहे.

परंतु केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे हा दरही नव्या हंगामातील सोयाबीनला मिळणे अशक्‍य आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ही चिंता आता मोठ्या आंदोलनाचे स्वरूप घेईल असे संकेत आहेत. सुरुवातीला शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर सोयाबीनला सहा हजार रुपयांचा दर मिळावा याकरिता मोहीम राबविली.

आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत तब्बल पाच हजार गावांमधून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना निवेदन पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरही शासनाकडून दखल न घेण्यात आल्यास ८ व ९ सप्टेंबर रोजी भोपाळ येथे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांची बैठक होत त्यात पुढील आंदोलनाची दिशा निश्‍चित केली जाणार आहे.

मध्य प्रदेशात सुमारे ५५ लाख हेक्‍टरवर सोयाबीन होते. नव्या हंगामातील सोयाबीन येण्यास १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. एकंदरीत स्थिती बघता ४,८९२ रुपयांचा हमीभाव मिळणे शक्‍य वाटत नाही. त्यातच केंद्र सरकार खाद्य तेलाची आयात करीत असल्याने चिंता वाढली आहे. परिणामी सोयाबीनला ६,००० रुपयांचा भाव मिळावा अशी मागणी आहे.
महेंद्र सिंह, शेतकरी, मोहाडिया, ता. जि. सिहोर, मध्य प्रदेश

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT