Ratnagiri -Nagpur Highway agrowon
ॲग्रो विशेष

Ratnagiri -Nagpur Highway : रत्नागिरी -नागपूर महामार्ग भूसंपादनाविरोधात कोल्हापुरातील शेतकऱ्यांचे ४ दिवसांपासून आमरण उपोषण

Raju Shetti : उपोषणकर्त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शनिवार (दि.१५) सकाळी १० वाजलेपासून उदगाव (ता. शिरोळ) येथील टोलनाक्यावर सांगली-कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून धरणार आहे". अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

sandeep Shirguppe

Ratnagiri -Nagpur Highway Oppose Farmers : रत्नागिरी -नागपूर महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमीनीचा मोबदला अत्यल्प मिळत असल्याने शिरोळ तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी मागील ४ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. उपोषण सुरू असतानाच शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटीसा आल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शनिवारी (ता.१५) उदगाव टोलनाक्यावर बेमुदत महामार्ग रोखणार आहे.

याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन उपोषणस्थळी शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेट्टी म्हणाले की, "कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या बाधित गावातील उदगांव व उमळवाड येथे सोमवारी (ता.१७) व मंगळवार (ता. १८) रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बेकायदीशीररित्या मोजणी करणार आहे. मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना पळवून लावा. जे अधिकारी शेतात खुणा रोवतील त्या खुणा उपसून टाका. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घ्यायचं नाही. उपोषणकर्त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शनिवार (दि.१५) सकाळी १० वाजलेपासून उदगाव (ता. शिरोळ) येथील टोलनाक्यावर सांगली-कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून धरणार आहे". अशी माहिती शेट्टी यांनी दिली.

"विक्रम पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून सुरू केलेला लढा आता शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आक्रमक झाला आहे. मागील ३ ३ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर जिल्ह्यातील शेतकरी जिल्हा पेटवून ठेवतील. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही." शेट्टी म्हणाले.

या गावांना बसणार महापुराचा फटका

रत्नागिरी नागपूर महामार्गातील कृष्णा नदीवरील होणाऱ्या पुलामुळे उमळवाड, कोथळी, सांगली शहर, धामणी, समडोळी कवठेपिराण, सांगलवाडी, हरिपूर, दानोळी, कवठेसार, हिंगणगांव, कुंभोज, दुधगांव, सावळवाडी, माळवाडी, किणी ते खोची या गावांनाही पुलाच्या भरावामुळे महापुराचा फटका बसणार आहे.

४ दिवसांपासून उपोषण

जैनापूर (ता. शिरोळ) येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चोकाक ते उदगाव बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई व उदगाव बायपास महामार्गावर होणारा मार्ग कसा करावा या मागण्यासाठी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून सकाळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन चौकशी केली.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील, कोथळीचे सरपंच अनमोल करे, जैनापुरच्या सरपंच संगीता कांबळे, ऋषभ पाटील, गौतम इंगळे, विजय खवाटे, भरतेश खवाटे, निळकंठ राजमाने, स्वस्तिक पाटील, दिग्विजय सूर्यवंशी , सुधाकर पाटील , शिवाजी कांबळे, यांच्यासह दहा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT