Onion Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : लेट खरीप कांदा लागवडीची तयारी

Onion Plantation : मध्यंतरी कांदा बियाणे दरवाढ सुरूच राहीली किंवा बियाणे अधिक दरात शेतकऱ्यांना घ्यावे लागेल, अशी स्थिती होती.

Team Agrowon

Dhule News : खानदेशात खरिपातील लेट किंवा उशिराचा कांदा लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत. त्यासाठी कांदा रोपवाटिका तयार केल्या जात असून, कांदा बियाण्याचे दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे.

मध्यंतरी कांदा बियाणे दरवाढ सुरूच राहीली किंवा बियाणे अधिक दरात शेतकऱ्यांना घ्यावे लागेल, अशी स्थिती होती. परंतु कमी पावसाने कांदा लागवडीबाबत भितीचे वातावरण आहे. अनेकांनी रोपवाटिका तयार करणे टाळले. आता उशिराच्या लागवडीसाठी रोपवाटिकांमधील रोपे तगण्याची स्थिती चांगली किंवा समाधानकारक राहील, असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

काही भागात या रोपवाटिका तयारही झाल्या आहेत. सततच्या पावसाने कांदा बियाणे बाजारातील तेजीही कमी होत आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकरी दर्जेदार बियाण्याची विक्री करीत आहेत. बियाणे उगवणीशिवाय पैसे देऊ नका, अशी हमी घेऊनही काही शेतकरी बियाणे विक्री करीत आहेत.

शेतकऱ्यांकडेही बियाणेसाठा

धुळ्यात शिंदखेडा, शिरपूर, जळगाव जिल्ह्यात जळगाव, एरंडोल, धरणगाव, रावेर, चोपडा आदी भागात अनेक कांदा बियाणे विक्रेते शेतकरी आहेत. ९०० ते १००० आणि १२०० रुपये प्रतिकिलो या दरात बियाण्याची विक्री ही मंडळी करीत आहे. अनेक शेतकरी लेट खरीप कांदा पिकाकडे वळत असल्याची स्थिती आहे. पुढे लागवडही वाढेल, असा अंदाज आहे.

यामुळे कांदा बियाण्यात तेजी येईल, असे दिसत होते. यातच जूनच्या सुरवातीला प्रतिकूल वातावरण होते. उष्णता, उष्ण वारे, मध्येच कमी अधिक पाऊस, अशी स्थिती होती. यात बियाण्याची उगवण व्यवस्थित होईल की नाही, अशी भीतीही होती.

परंतु शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन करून रोपवाटिकांमध्ये बियाण्याची उगवणक्षमता टिकविली. कमी पावसामुळे कांदा लागवडीवर परिणामही काही भागात झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Pik Pahani : सरकारी कामाचा मोबदला कधी मिळणार? तांत्रिक अडचणींमुळे ‘ई-पीक’ सहायकांचे मानधन रखडले!

Maharashtra Farmers : बाजार समितीला शेतकऱ्यांचा विसर? मूलभूत सुविधांअभावी बळीराजाची मोठी पिळवणूक!

Shaktipeeth Highway Protest: 'शक्तिपीठ'विरोधात आंदोलन पेटले, मोजणीचे साहित्य फोडले, सांगलीच्या माहुलीत राजू शेट्टींसह शेतकऱ्यांचा ८ तास ठिय्या

Bal Vivah Mukt Bharat : बालविवाहाची प्रथा मुळापासून नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्धार; 'बाल विवाहमुक्त भारत' मोहीम सुरू

Employment Guarantee : ग्रामीण रोजगाराला मोठी चालना: ‘रोजगार हमी’च्या कामांवर पाथर्डी आणि संगमनेर तालुक्यांत सर्वाधिक मजूर!

SCROLL FOR NEXT