Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी जमीन मोजणीस येणाऱ्यांना गावबंदी

Land Acquisition : अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे दोन भाग होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’मधील संरक्षित निसर्ग उद्ध्वस्त होणार आहे.

Team Agrowon

Sangli News : आगामी काळात मिरज तालुक्यात होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय बुधगाव (ता. मिरज) येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत बुधगावातील ग्रामसभेत तसा ठराव संमत करण्यात आला. ‘शक्तिपीठ’बाधित शेतकरी बचाव कृती समितीतर्फे हनुमान मंदिरात बैठक झाली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे म्हणाले, ‘‘शक्तिपीठ महामार्ग करावा, अशी कोणाचीही मागणी नाही. राज्यातील कोणत्याही भाविकांनी मागणी केलेली नाही. रत्नागिरी-नागपूर महामार्गाला समांतर हा महामार्ग कशासाठी केला जातो. २७ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे.

शेकडो शेतकरी भूमिहीन होणार आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे दोन भाग होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’मधील संरक्षित निसर्ग उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे ग्रामसभांनी केलेल्या ठरावानुसार जमीन मोजणीसाठी येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना गावबंदी केली जाईल.’’

किसान सभेचे उमेश देशमुख म्हणाले, ‘‘शक्तिपीठ महामार्ग ठेकेदारांना पोसण्यासाठी सुरू आहे. रस्त्याच्या मोजणीसाठी कर्मचाऱ्यांनी येऊ नये. आल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. जमीन आमची आहे. आमच्या जमिनीत कोणीही पाय ठेवता कामा नये. गावात शासकीय कर्मचाऱ्यांना बंदी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.’’

विक्रम पाटील म्हणाले, ‘‘ग्रामसभेत ठराव केला आहे. सर्व शेतकऱ्यांचा विरोध असून महामार्गासाठी कुणीही शेतकरी जमीन देणार नाही. त्यामुळे मोजणीसाठी कुणीही शासकीय कर्मचाऱ्यांनी येऊ नये. आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ग्रामसभा गावाची संसदच आहे. ती कायदेशीररीत्याही सर्वोच्च आहे. त्यामुळे त्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.’’

मनोहर पाटील, बाळासाहेब पाटील, दिनकर साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. पी. एम. पाटील, प्रवीण पाटील, अधिक पाटील, सचिन पाटील, धनाजी पाटील, अमर पाटील, सयाजी कदम, बाळू पाटील, रामदास गुरव, नीलेश बाबर, अनिल कोकाटे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : केंद्र सरकारकडूनही मिळणार मदत ः बावनकुळे

Crop Loan Fraud : ‘बनावट सात-बाराचा वापर करून पीककर्जाची उचल’

Shivsena Protest : जिल्हा अधीक्षकांच्या अंगावर टाकले सोयाबीन

Kharif Sowing : हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन पेरणीत घट, कपाशी, तुरीच्या पेऱ्यात वाढ

Solapur Flood : शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे लवकर पूर्ण करा, कृषिमंत्री भरणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT