Maize Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Threshing : मका मळणीची कापडणेत लगबग

Maize Crop : पूर्वी बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन आदी पिकांच्या मळणीसाठी ‘खळे’ लावले जात होते. त्यानंतर गावात थ्रेशर आले.

Team Agrowon

Maize Harvesting : पूर्वी बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन आदी पिकांच्या मळणीसाठी ‘खळे’ लावले जात होते. त्यानंतर गावात थ्रेशर आले. आता तर थेट शेतीच्या बांधावरच आधुनिक थ्रेशर यंत्र व हार्वेस्टर जात असल्याने शेतकऱ्‍यांची मोठी सोय झाली आहे. मेहनतीसह आर्थिक बचतही झाली आहे. आता प्रत्येक गावात दोन-चार ट्रॅक्टरवर थ्रेशर मशिन असल्याने शेतीशिवारात थ्रेशरचा आवाज घुमू लागला आहे.

खळे लावणे कालबाह्य

पन्नास वर्षापूर्वी बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा, मका, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिकांच्या मळणीसाठी खळे लावले जात होते. खळ्यामध्ये कणसे पसरवून त्यावर बैलजोडी फिरवली जात होती. एकरभर शेतीतील पिकांसाठी हे काम दिवसभर चालायचे. त्यानंतर उफणणी सुरु व्हायची. शेतकरी व शेतमजुरांसाठी खुपच कष्टाचे काम होते. आता थ्रेशरसह हार्वेस्टरच्या जमान्यात हे सारे कालबाह्य झाले आहे.

बांधावर थेट थ्रेशर

पिकांची काढणी, कापणी, मळणी व उफणणीची कामे लिलया होवू लागली आहेत. १९८५ पासून थ्रेशर यंत्र आले. गावाबाहेरील खळ्यांमध्ये पिकांची मळणी होवू लागली. आता गेल्या पाच-सहा वर्षांपासून अर्थात कोरोनापासून ट्रॅक्टरला जॉईन असलेले भलेमोठे थ्रेशर यंत्र थेट बांधावर जावून पिकांच्या काढणीसह मळणीचे काम करीत आहे.

हार्वेस्टरमुळे मोठी सोय

पंधरा वर्षांपासून पंजाब व हरयानातील हार्वेस्टर येवू लागले आहेत. त्यामुळे गव्हाची काढणी खूपच सोपी झाली. आता तर स्थानिक शेतकऱ्‍यांनी व हरहुन्नरी युवकांनी स्वतः हार्वेस्टर घेतले आहेत.

इतर पिकांचेही हार्वेस्टर घेतल्याने शेतकऱ्‍यांची मोठी सोय झाली आहे. आर्थिकसह वेळ व मेहनतीची मोठी बचत झाली आहे.

माझ्याकडे सर्व पीक काढणीचे हार्वेस्टर आहे. यामुळे पीक काढणीचे काम खूपच सोपे झाले आहे.
- नरेंद्र पाटील, कापडणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Policy: ‘बांबू धोरण २०२५’ राबविण्याचे आदेश

Mahavistar App: कोणत्या हंगामात काय पेरायचं, कधी विकायचं?

India Russia Relations: पंतप्रधान मोदी दबावाला बळी न पडणारे नेते

Sugar Mills: कोट्यापेक्षा जास्त साखर विक्री केल्यास दंडात्मक कारवाई

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वितरण संथ गतीने

SCROLL FOR NEXT