Kolhapur Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Farmers : बळिराजा सुखावला! खायला शाळूही मिळाला अन् जनावरांना कडबाही

Fodder For Animals : रब्बी पिकांना पोषक वातावरणा मिळाल्याने पिके अगदी जोमदार आले असून सर्वत्र शाळू काढण्याचे काम सुरू आहे.

sandeep Shirguppe

Rabi Season : यंदा पाऊसचं न झाल्याने खरिप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला परंतु रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा आणि भूईमुग पिकाला थोडासा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. रब्बी पिकांना पोषक वातावरणा मिळाल्याने पिके अगदी जोमदार आले असून सर्वत्र शाळू काढण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना ज्वारी बरोबर जनावरांच्या वैरणीचीही चिंता मिटत आहे. कडबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

यावर्षी सुरवातीला कडब्याला २० ते २५ रुपये दर पेंडीला मिळत असल्याने शाळू उत्पादकांच्या हाती चार पैसे शिल्लक राहल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. जास्त प्रमाणात कापणी सुरू झाल्यावर दर २० रुपये पेंडी झाला. २० ते २५ रुपये दर परवडतो. पावसाळ्यातील बेगमी झाल्याने पशुपालकांत समाधान व्यक्त होत आहे.

पावसाळी पीक काढल्यानंतर शेतकरी थंडीच्या हंगामात शाळू पेरणी करतो. यावर्षी शाळू पिकासाठी वातावरण चांगले असल्याने व कमी पाण्यावरही चांगले पीक येत असल्याने अनेक ठिकाणी शाळू पीक जोमदार आले. अनेक गावांत पाऊस कमी झाल्याने ऊस पिकाला पाणीपुरवठा केला नाही. त्यामुळे शाळू क्षेत्र वाढले.

उताराही चांगला पडल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. शाळूच्या कडब्याला चांगली मागणी होत आहे. अनेकजण म्हशी, गाई, जनावरे पाळतात. त्यांना कडब्याचा वैरणीसाठी मोठा आधार आहे कडब्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते. जनावरांसाठी पोषक घटक मिळाल्याने जनावरांना आरोग्यासाठी कडबा उपयुक्त आहे.

ऊस क्षेत्र वाढल्यामुळे अनेक शेतकरी शाळू उत्पादन करत नाहीत. त्यामुळे शाळू उत्पादकांकडे कडव्याची मागणी अगोदरच शेतकरी करतात. त्यामुळे दहा ते पंधरा वर्षांत कडबा मागणी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात शेळीपालन करणारेही कडबा पावसाळ्यात जनावरांच्या वैरणीसाठी खरेदी करून ठेवतात.

कडबा कुट्टीला मागणी कडबा चांगल्या पद्धतीने साठवणूक करण्यासाठी व वर्षभर वापरासाठी कडबा कुट्टीद्वारे बारीक कुट्टी करून पोत्यामध्ये भरून ठेवला जातो. धारा काढावयाच्या वेळेस जनावरांना घातल्यास दूध उत्पादनात वाढ होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे कडबा कुट्टी मशीन आहेत; तर अनेक ठिकाणी कडबा कुट्टीच्या बोद (मोठे पोते) विकत मिळतो.

यंदा पावसाळ्यानंतर थंडीच्या मोसमात शाळू लागवड केली, उत्पादनही चांगले आहे. तसेच शाळूची उंची चांगली असल्यामुळे सुरवातीला कडब्याला २० ते २५ रुपयांच्यादरम्यान दर मिळाला. नंतर तो १८ ते २० रुपये पेंडी झाला. शाळू दर ५० रुपये खाली आल्याने शेतकऱ्यांच्यात थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती आहे - तुकाराम मलकर, शेतकरी, उचगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election: शिंदेंचा निवडणुकीवरील खर्च मोजा, राज्याच्या बजेटच्या किती टक्के?; काँग्रेसचा सवाल

Municipal Result 2025: विटा नगर परिषदेत ५० वर्षांनंतर सत्तांतर

Mahagaon APMC: महागाव बाजार समितीत सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव

Local Body Result: सावंतवाडी, वेंगुर्लेत भाजप, मालवणात शिंदे शिवसेना

Animal Feed Technology: पशू आहारातील मायक्रो इनकॅप्सुलेटेड तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT