Milk Farmer Hunger Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Issue : दूध दरावरून गणोरे येथे शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

Team Agrowon

Nagar News : दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये दर मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी सोमवारपासून (ता. १) गणोरे (ता. अकोले) येथे शुभम आंबरे व संदीप दराडे या दूध उत्पादक तरुण शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दूधप्रश्न मार्गी लावल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसण्याचा इशारा या तरुणांनी दिला असून परिसरातील शेतकरी दूध उत्पादकांनी ही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

सरकार आणि दूधसंघ चालक दूधव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने हा व्यवसाय मोडकळीस येऊ लागला आहे. गेल्या वर्षभरापासून दुधाला दर नाही. यंदा राज्यातील अनेक भागांत दुष्काळाशी सामना करून दूध व्यवसाय जपला. उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन घटते, शिवाय लग्नसराई यामुळे दुधाला मागणी असते.

असे असतानाही दुग्धजन्य पदार्थाला मागणी नसल्याचे कारण पुढे करत संपूर्ण उन्हाळ्यात दुधाचे दर खरेदीदारांनी पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पशुखाद्याचे व चाऱ्याचे दर वाढलेले असताना दुधाचा दर मात्र २७ रुपये लिटरच्या आत कसा राहील त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. शेतकऱ्यांची खूपच ओरड झाली, संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात गाईच्या दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान दिले.

मात्र ते अनुदान त्यातील किचकट अटींमुळे अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाही. तीन महिने झाले अनुदान बंद आहे. आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा शेतकऱ्यांना मान्य नसल्याचे गेल्या आठ दिवसांतील परिस्थितीवरून दिसून येत आहे. अनुदान हे गाजर असून त्याऐवजी दुधाला प्रती लिटर ४० रुपये दर मिळावा अशी मागणी आहे.

गणोरे येथील मुख्य चौकात आजपासून शुभम आंबरे व संदीप दराडे या दूध उत्पादक तरुण शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दूध उपाध्यक्ष करीत सुशांत आरोटे, नानासाहेब उगले, ज्ञानेश्वर आहेर प्रदीप भालेराव भाऊसाहेब नाईकवाडी बाबासाहेब उगले अमोल ठुबे यांच्यासह परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT