Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : सहा लाख हेक्टरवर खरिपाचा होणार पेरा

Kharif Season 2025 : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातच मे मध्ये जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे.

Team Agrowon

Nashik News : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातच मे मध्ये जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. त्यानुसार कृषी विभागाने आगामी खरीप हंगामातील पेरण्यांच्या अनुषंगाने नियोजन केले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदा ६ लाख ४० हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या प्रस्तावित आहेत.

जिल्ह्यात तीन वर्षांपासून खरीप हंगामाचे क्षेत्र सहा लाख हेक्टरवर राहिले आहे. यात मका, सोयाबीन व भात ही तीन प्रमुख अन्नधान्य पिके आहेत. कडधान्यात तूर, मूग, उडीद यांचे ही पिके आहेत. मात्र परतावा अत्यल्प असल्याने एक क्षेत्र कमी होत आहे. गळीत धान्यात भुईमूग, कारळे, सोयाबीन ही पिके आहे. त्यात सोयाबीन सर्वाधिक क्षेत्र असेल. तर नगदी पिकांमध्ये कापसाचे क्षेत्र काही प्रमाणात वाढलेले दिसते.

मक्याला मिळणारा भाव, मागणी व जनावरांची चाऱ्याची सोय व इतर पिकांच्या तुलनेत होणारे अल्प नुकसान यामुळे मका हे खरिपातील प्रमुख पीक झाले आहे. मक्याचा सर्वाधिक २ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा प्रस्तावित आहे.

गळीत धान्य पिकांमध्ये सोयाबीन पेरा जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावर आहे. तृणधान्य पिकांमध्ये मक्यानंतर सर्वाधिक ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडी होण्याचा यंदा अंदाज आहे. मात्र अपेक्षित परतावा व उत्पादकता नसल्याने कडधान्य व गळीत धान्य पिकांचे क्षेत्र गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सातत्याने कमी होत असल्याचे नकारात्मक चित्र आहे.

खते बियाणे

कृषी विभागाचे नियोजन

जिल्ह्यात बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. बियाण्यांचा कुठलाही तुटवडा भासणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी १ लाख २० हजार ४७३ क्विंटल बियाणे गरज आहे.

सध्या १ लाख ८ हजार १३२ क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध आहे. अडीच लाख टन रासायनिक खतांची मागणी आहे. त्यापैकी २.२७ लाख टन खतांचा पुरवठा मंजूर आहे. त्यापैकी विक्री होऊन मंगळवारअखेर (ता. १०) १.१ लाख क्विंटल खते उपलब्ध आहेत. यात डीएपी, एमओपी, एनपीकेएस, युरिया आदींचा समावेश आहे.

जिल्ह्यात खरिपातील प्रमुख प्रस्तावित पिके

पीक प्रस्तावित क्षेत्र (हेक्टर)

भात ९३,४६७

खरीप ज्वारी ९३४

बाजरी ८०,२१५

नागली १६,९४६

मका २,३६,२३९

इतर खरीप तृणधान्यपिके ११,२०७

तूर ६,३४७

मूग १९,६५८

उडीद ७,२५९

इतर कडधान्य पिके २,५८२

भुईमूग २४,१२८

तीळ १००

कारळे २,२९०

सूर्यफूल ३५

सोयाबीन ९९,९४१

इतर गळीतधान्य पिके २,५८१

कापूस ३९,१७४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे आरोपी सुटतात निर्दोष

Crop Insurance Scam: विनयकुमार आवटेंची ‘एसआयटी’ चौकशी करा

Betel Leaf Rate: खाऊच्या पानांच्या दरात घट

Assembly Monsoon Session: सौर पंपांऐवजी वीज पंप देण्याबाबत धोरण आणू: ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

Ethanol Blending: जूनमध्ये इथेनॉल मिश्रण पोचले १९.९ टक्क्यांपर्यंत

SCROLL FOR NEXT