Seed Production Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Competition : राज्यस्तरीय पीक स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांची बाजी

Kharif Season 2024-25 : राज्यस्तरीय खरीप हंगाम २०२४-२५ साठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .

Team Agrowon

Satara News : राज्यस्तरीय खरीप हंगाम २०२४-२५ साठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . या राज्यस्तरीय स्पर्धांचे निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी बाजी मारत सर्वसाधारण गटामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय गुणानुक्रम मिळवला आहे.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होण्यास मदत होते. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना मिळू शकते व त्यामुळे राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उ‌द्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत असतात.

पीक स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांनी मिळवलेली उत्पादकता ही त्या पिकाच्या मागील पाच वर्षाच्या सरासरीच्या दीडपट किंवा त्याहून अधिक असल्यास ते राज्यस्तरीय, जिल्हा व तालुकास्तरावरील पुरस्कारासाठी पात्र ठरतात. अशा उत्पादक शेतकऱ्यांची निवड राज्यस्तरावर करण्यात येते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण चार शेतकरी राज्यस्तरावर विजेते ठरले आहेत.

यामध्ये बाजरी पिकामध्ये शिवाजी चोपडे यांचा राज्यात प्रथम क्रमांक बक्षीस रक्कम ५० हजार व शेतकरी तुकाराम मुळीक यांचा राज्यात तृतीय क्रमांक बक्षीस रक्कम ३० हजार, ज्वारी उत्पादनात शेतकरी विठ्ठल मुळगावकर यांचा राज्यात द्वितीय क्रमांक बक्षीस रक्कम ४० हजार तसेच सोयाबीन पिकामध्ये शेतकरी गणेश साळुंखे यांचा राज्यात ‌द्वितीय क्रमांक बक्षीस रक्कम ४० हजार असा गुणानुक्रम आला आहे.

भात, बाजरी, मका, तूर, मूग आणि, उडीद या पिकांमध्ये २०२३ च्या तुलनेत सरासरी उत्पादकता वाढली आहे. राज्यस्तरावरील विजेते ठरल्यानंतर, उर्वरित स्पर्धकांमधून जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर विजेते शेतकरी निवडले जाणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Department Action: कांदळवन कारवाईवर संशय

Milk Adulteration: ‘एफडीए’च्या कारवाईने दुग्ध व्यवसायात खळबळ

Women In Agriculture: ससून नवघरच्या डोंगरावर बहरली फळबाग

Village Road: पंचवीस वर्षांपासूनचा रस्त्याचा वाद मिटला

Tur Crop Insurance: चौदा मंडलामध्ये तुरीचा २२ कोटी १३ लाख रुपये पीकविमा परतावा देय

SCROLL FOR NEXT