Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Fear : पावसाची शेतकऱ्यांना धास्ती

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचे वातावरण आहे. जिल्ह्यात निफाड, सटाणा, देवळा, चांदवड, येवला सह नाशिक शहर परिसरात रविवार (ता. २२) रोजी मध्यम ते हलक्या पावसाने हजेरी लावली.

सोमवार (ता. २३) रोजी अनेक भागात पावसाने सलग लावली. एकीकडे मका, बाजरी, सोयाबीन कापणी सुरू आहे.त्यातच पाऊस सुरू झाल्याने कामात व्यत्यय येत असून शेतकरी धास्तावले आहेत.

जिल्ह्याच्या विविध भागात यंदा खरिपाचा चांगल्या प्रकारे झाला त्यानुसार मका सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक दिसून आले सध्या या पिकांची कापणी सुरू झाली आहे असे असतानाच पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची अडचण होण्याची शक्यता आहे दुसरीकडे द्राक्ष छाटणीला वेग येणार असताना पावसामुळे पुन्हा त्या थांबण्याची शक्यता आहे.

चांदवड तालुक्यातील वडनेर, वडाळीभोई या महसूल मंडळात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. तर धोडांबे व दिघवद महसूल मंडळात हलक्या पावसाच्या सरी झाल्या आहेत. तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात वडनेर भैरव परिसरात द्राक्ष छाटण्या सुरू झाल्या आहेत. मात्र पाऊस सुरू झाल्याने त्यात अडथळा येत आहे. तर पूर्व भागात मका व सोयाबीन कापणी वेग घेत असताना कामात व्यत्यय आला आहे.

जिल्ह्यात पूर्व भागात निफाड तालुक्यातील निफाड, रानवड, ओझर, पालखेड या महसूल मंडळात मध्यम ते हलक्या पावसाने हजेरी लावली. येथेही सोयाबीन मका उत्पादकांची धाकधूक वाढली आहे.

तर द्राक्ष छाटणी कामे काही ठिकाणी थांबली आहेत. येवला तालुक्यातील पाटोदा, सावरगाव, जळगाव या महसूल मंडळातही हलका पाऊस झाला तर नांदगाव तालुक्यातील मनमाड परिसरातही या पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. नाशिक शहर परिसरात नाशिक, देवळाली, सातपूर, पाथर्डी येथे व देवळा तालुक्यात हलक्या सरी झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy Malpractice : अनुदान गैरव्यवहारप्रकरणी सात कर्मचाऱ्यांचे निलंबन

Maharashtra Politics : अजित पवार यांच्यासह महायुती एकत्रित लढणार

Turmeric Disease : हळदीवर करपा,कंदमाशीचा प्रादुर्भाव

Seed Production : ‘वनामकृवि’चे खरिपात तेराशे हेक्टरवर पैदासकार बीजोत्पादन

Cotton Crisis : कपाशीवर संकटांचा फेरा

SCROLL FOR NEXT