Maharashtra Politics : अजित पवार यांच्यासह महायुती एकत्रित लढणार

Politics Update : आज भाजप नेते तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे महायुती एकत्रितच लढणार असल्याचे जाहीर केले.
Amit Shah
Amit ShahAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न भाजप आणि शिवसेनेच्या वतीने केले जात असल्याचा आरोप होत असताना आज भाजप नेते तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे महायुती एकत्रितच लढणार असल्याचे जाहीर केले.

नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा कुठलाही भेदभाव न करता, तसेच मनात किंतु परंतु न ठेवता महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन श्री. शहा यांनी केले. त्यांच्या वक्त्याव्यानंतर महायुतीबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

Amit Shah
Maharashtra Politics : ओठात एक पोटात एक, अशी भूमिका नाही : एकनाथ शिंदे

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अजित पवार चाळीस आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होईल असे भाजपसह सर्वच पक्षांना वाटत होते. मात्र निकाल वेगळे आले. महायुतीला विशेषतः फायदा होण्याऐवजी अधिकच नुकसान झाले असल्याचे दिसून येते.

स्वतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला. भाजपला सर्वाधिक फटका विदर्भात बसला होता. त्यानंतर अजित पवार यांच्यामुळे भाजपचे नुकसान झाल्याचे निष्कर्ष काढले जात होते. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना सोबत घेऊन लढू नये अशी जाहीर मागणी केली होती.

Amit Shah
Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील पक्षांचे १२५ जागांवर एकमत

मध्यंतरी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी सुद्धा त्यांच्यावर थेट टीका केली होती. त्यामुळे महायुतीत मोठा विसंवाद असल्याचे दिसून येत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा जाहीर कार्यक्रमांमधून महायुतीमधील कुठलाही घटकपक्ष दुखावणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली होती.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com